💥२६ नोव्हेंबर चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला

संकलन- भद्रा मारुतीहून सतीश कोळी,महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP

हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण आणि धक्कादायक हल्ला होता.

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झालेमुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले.
यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.[७] भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.
*हल्ल्याची ठिकाणे*
हल्ल्याची ठिकाणे व
ठिकाण हल्ल्याचा प्रकार
● छत्रपती शिवाजी टर्मिनस -गोळीबार,
● लियोपोल्ड कॅफे, कुलाबा गोळीबार
● ताज महाल हॉटेल गोळीबार,६ बॉम्बस्फोट, आग, ओलिस,
● ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल-गोळीबार, बॉम्बस्फोट
● मादाम कामा इस्पितळ - गोळीबार, ओलिस
● नरीमन हाउस- गोळीबार,ओलिस
● मेट्रो सिनेमा - गोळीबार
● माझगांव डॉक बॉम्बस्फोट
● विले पार्ले बॉम्बस्फोट
*घटनाक्रम*
गेल्या काही वर्षांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरून समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरून सोडण्यात आल्या होत्या.

बातमी अहवालांनुसार नोव्हेंबर २६ रोजी रात्री ८:१० वाजता एका अशा बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले. पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले. ८:२० वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणाऱ्या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.नोव्हेंबर २६ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. ४७ असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले. यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या. याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह १५ जणांना ओलिस घेतले. रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलीस मुख्याधिकाऱ्यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताज होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे, पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच. इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी ४० ओलिस धरले. यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती. २८ला पहाटे ४:२२ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली. यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारून इमारतीचा ताबा घेतला.
या वेळी दोन्ही होटेलना आगी लागलेल्या होत्या व लश्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता. सुमारे ४०० लश्करी कमांडो आणि ३०० एन.एस.जी. कमांडो तसेच ३५-१०० मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते. या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.

भारतात प्रवेश

  तारीख  अंदाजे वेळ
(भारतीय) घटना
*नोव्हें २१* संध्याकाळ कराचीहून एका बोटीतून दहा दहशतवादी निघाले,
*नोव्हें २२* विनाशसामुग्रीचे वाटप. प्रत्येकाला ३० गोळ्या असलेली ६-७ मॅगेझिन देण्यात आली. याशिवाय प्रत्येकाला ४०० गोळ्या, ८ हातबॉम्ब, एक ए.के. ४७ असॉल्ट रायफल, स्वयंचलित रिव्हॉल्व्हर, क्रेडिट कार्डे व सुका मेवा देण्यात आला.
*नोव्हें २२*
इतर काही दहशतवादी ताजमहाल होटेलमध्ये हत्यारे व दारुगोळा घेउन राहण्यास दाखल झाले.
*नोव्हें २३*
पाकिस्तानहून निघालेल्या दहशतवाद्यांनी कुबेर नावाच्या एक भारतीय ट्रॉलरवर हल्ला केला. त्यातील ४ कोळ्यांना ठार मारून कप्तानाला भारताच्या किनाऱ्याकडे जाण्यास भाग पाडले.
*नोव्हें २४*
कुबेरच्या कप्तानाला ठार मारून दहशतवादी गुजरातजवळ आले. तेथे पांढरा झेंडा फडकावून त्यांनी एका तटरक्षक नौकेला जवळ खेचले. चौकशी करण्यासाठी दोन तटरक्षक अधिकारी कुबेरवर आले असता त्यातील एकाला ठार मारले व दुसऱ्याला मुंबईकडे बोट नेण्यास भाग पाडले.
*नोव्हें २६-दुपार, संध्याकाळ*
दहशतवादी मुंबईपासून चार समुद्री मैलावर आल्यावर दुसऱ्या तटरक्षक अधिकाऱ्याला ठार केले. यानंतर संध्याकाळी दहशतवादी तीन हवा भरलेल्या छोट्या तराफ्यांत चढले आणि कुलाब्याकडे निघाले.
*नोव्हें २६- रात्र*
पाकिस्तानहून निघालेले ही दहा माणसे कफ परेडजवळ बधवार पार्क येथे आली. हे ठिकाण नरीमन हाउस पासून अर्ध्या किलोमीटरवर आहे.
*नोव्हें २६ - रात्री उशीरा*
या दहांपैकी चार ताजमहाल होटेलमध्ये आले, दोघे ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, दोन नरीमन हाउसला गेले तर उरलेले दोघे, आझम आणि इस्माईल, टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले.
*ताज हाँटेल*
*ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल*
*नरीमान हाउस*
नुकसान- या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. [४९] तर २९३ जण जखमी झाले आहेत.[४९] यांत १२१ भारतीय नागरिक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि ३४ परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन आहेत.
यांशिवाय नऊ अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले.

जखमी झालेल्या इतर २६ परदेशी नागरिकांना बॉम्बे हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आहे.

*मृत्यू पावलेल्या प्रमुख व्यक्ती*
प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलीस वीरमरण पावले आहेत.

● तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वतःचे प्राण गमावले.
● हेमंत करकरे - मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी
● अशोक कामटे - ऍडिशनल पोलीस कमिशनर
● विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट
● शशांक शिंदे - वरिष्ठ पोलीस निरिक्षक
● मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी
● हवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो
● हवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो
● छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.
● अँड्रियास लिव्हरास हा ब्रिटिश उद्योगपती हल्ल्यांत मृत्यू पावला.
● जर्मन दूरचित्रवाणी निर्माता राल्फ बर्केई, ● फ्रेंच उद्योगपती लूमिया हिरिद्जी आणि तिचा नवरा हेही मृतांत आहेत. ● नरीमन हाउसमध्ये गॅव्रियेल नोआह होल्त्झबर्ग, त्यांची पत्नी रिव्का होल्त्झबर्ग हे मृत्युमुखी पडले.

महाराष्ट्र सरकार ने== प्रत्येक मृताच्या नातेवाईकास ५ लाख रुपये तर जखमींना ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
================
संकलन-सतीश कोळी,खुलताबाद
स्रोत- विकिपीडिया




Post a Comment

0 Comments