अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने समिती गठीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला समितीत स्थान

राज्यातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबत...
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
_*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला समितीत स्थान..*_
_संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ५०६/ टीएनटी -१, दिनांक- ०६/०९/२०२३_

_*राज्यातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असल्याने अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारी निवेदने तसेच विधी मंडळ सदस्य यांचे कडून याबाबत अधिवेशनात विविध आयुधांमार्फत होत असलेली मागणी विचारात घेता, शासनाने उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये समिती गठीत केलेली आहे.*_

_त्याच अनुषंगाने राज्यस्तरावर संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या कामांमध्ये माहितीशी संबंधित कामे, विविध अप्लिकेशन संबंधित कामे तसेच वार्षिक सर्वेक्षण संबंधित कामे या अंतर्गत शिक्षकांना जी अशैक्षणिक कामे करावी लागतात अशा कामांची विगतवारी करण्यासाठी समितीची बैठक दिनांक २१.११.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मंडळ, पुणे येथे घेण्यात येणार आहे._
_तरी सदर बैठकीस खालील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे._
=================
_*अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने समिती गठीत*_
_महाराष्ट्र राज्य प्राथमिक *शिक्षक समितीला समितीत स्थान..*_
=================
_*राज्य उपाध्यक्ष मा.राजनजी सावंत यांची समितीत वर्णी*_
=================
_१). श्री शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे २.-अध्यक्ष_

_२). श्री श्रीराम पानझाडे, उपसंचालक, शिक्षण आयुक्तालय, म.रा. पुणे- सदस्य_

_३). श्री देविदास कुलाळ, उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे - सदस्य_

_४). श्री सुरेंद्र गायकवाड, जि.प. शाळा मेढत, ता. बारामती- सदस्य_

_५). श्री बाळासाहेब झावरे,-सदस्य_

_*६). श्री राजन सावंत राज्य उपाध्यक्ष शिक्षक समिती- सदस्य*_

_७). श्री संभाजी पाटील, जि.प. प्राथ.शाळा देवरुख- सदस्य_

_८). श्री आबासाहेब जगताप- सदस्य_

_९). प्रवीण गायकवाड, अधीक्षक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे.- सदस्य सचिव_

_*स्वाक्षरीत*_
(शरद गोसावी)
_*शिक्षण संचालक (प्राथमिक)महाराष्ट्र राज्य, पुणे-०१*_

_प्रत माहितीस्तव सविनय सादर- १) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई-३२_
_२) मा. आयुक्त, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर._

Post a Comment

0 Comments