शिक्षकांचे पगार रोखाल तर...! शिक्षक समितीचा इशारा... 'यू-डायस' मधील अडचणी दूर करा.


🧑‍🏫 शिक्षकांचे पगार रोखाल तर...!

शिक्षक समितीचा इशारा...
'यू-डायस' मधील अडचणी दूर करा.
संकलन:सतीश कोळी, शिक्षक समिती MSP
===============
_*लोकमत न्यूज नेटवर्क*_
_मुंबई : राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांची 'यू-डायस' या ऑनलाइन प्रणालीत माहिती भरण्यास शिक्षकांचा वा शाळांचा विरोध नसून या प्रक्रियेत ज्या अनंत अडचणी आहेत, त्या आधी दूर करण्यात याव्या. अन्यथा शिक्षकांचे वेतन अदा न करण्याच्या कारवाईविरोधात संबंधित न्यायाधिकरणाकडे दाद मागू, असा इशारा *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* ने दिलाआहे. राज्यातील शाळांनी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती भरावी. अन्यथा वेतन अदा न करण्याचा इशारा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिला आहे._
_'अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांकडे ऑनलाइन माहिती भरण्यासाठी सुविधा नाहीत. माहिती मागविण्याच्या प्रपत्रातही वारंवार बदल होत असल्याने विलंब होतो असे समितीचे सरचिटणीस राजन कोरगांवकर यांनी अडचणींचा पाढा मांडला._
_*चालढकल करत असल्याचा ठपका*_
_बहुतांश शाळांनी माहिती भरली आहे. परंतु, ज्या विद्याथ्यांचे आधार कार्ड नाही, वा शालेय नोंदीशी आधार कार्डातील माहिती जुळत नाही, माहिती भरण्यास अडचणी येत आहेत. शिक्षक माहिती भरण्यास असा ठपका त्यांच्यावर मारणे योग्य नाही, अशी भूमिका समितीने पत्रात मांडली आहे._

_*ही सरकार, प्रशासनाची जबाबदारी*_
_■ अडचणींची सोडवणूक झाल्यास तसेच संबंधित शाळांच्या शिक्षक- मुख्याध्यापकांना योग्य मार्गदर्शन केल्यास माहिती भरणे सुकर होईल._
_■  त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा व योग्य मार्गदर्शन करणे ही सरकारची, प्रशासनाची जबाबदारी आहे. असे *समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी स्पष्ट केले.*_

Post a Comment

0 Comments