श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द कधी वापरतात? दोन्ही शब्दांमधला नेमका फरक काय?
संकलन- भद्रा मारुतीहून सतीश कोळी,शिक्षक समिती छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP
_श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द वापरताना अनेकदा अनेकांची गल्लत होते.. जाणून घ्या या दोन शब्दांचे अर्थ आणि त्यातला फरक_
https://www.loksatta.com/do-you-know/what-do-the-words-shradhanjali-and-adaranjali-means-and-what-is-the-difference-between-the-two-scj-81-4066768/
Written by समीर जावळे
Updated: November 27, 2023 19:22 IST
_श्रद्धांजली आणि आदरांजली हे आपल्या कानांवर अनेकदा पडणारे शब्द आहेत. अपघात होतो, त्यात लोक मृत्यमुखी पडतात त्यावेळी त्यांच्याविषयी मनातल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडून या शब्दांचा वापर केला जातो. एखाद्याच्या मृत्यूची बातमी ऐकली की आपणही मेसेजवर लिहितो भावपूर्ण श्रद्धांजली. अमुक अमुक नेत्यांनी आदरांजली वाहिली असेही शब्दप्रयोग आपण वाचतो. मात्र श्रद्धांजली आणि आदरांजली या दोन शब्दांमधला नेमका फरक काय? हे आपण समजून घेणार आहोत._
_*आदरांजली आणि श्रद्धांजली यातला फरक काय?*_
_अंजली म्हणजे ओंजळ. ओंजळी फुलं घेऊन अर्पण केली की त्याला पुष्पांजली असं म्हटलं जातं. आदरांजली आणि श्रद्धांजली या दोन शब्दांमध्ये किंचीतसा फरक आहे. त्यामुळे हे दोन शब्द वापरताना अनेकांची गल्लत होते. श्रद्धेने अर्पण केलेली असते श्रद्धांजली. आदरपूर्वक अर्पण करतात ती आदरांजली. श्रद्धा आणि आदर यांच्यात सूक्ष्म फरक आहेच. आदर हा ज्ञात गोष्टींशी, व्यक्तींशी संबंधित असतो. तर श्रद्धा ही अज्ञात गोष्टींशी संबंधित असते. ज्यांच्याविषयी आदर वाटतो त्यांना द्यायची आदरांजली. दिवंगत व्यक्तींना वाहायची ती श्रद्धांजली. असा या दोन शब्दांचा अर्थ आहे._
_‘कहाणी शब्दांची-मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या सदानंद कदम लिखित पुस्तकात हा अर्थ देण्यात आला आहे. मराठ्यांचा इतिहास आणि मराठी साहित्य हे सदानंद कदम यांनी अभ्यासलेले विषय आहेत. अनेकदा चुकीचे शब्द वापरले जातात. ते शब्द योग्य कसे आहेत हे सांगण्याचा यथार्थ प्रयत्न त्यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे._
_श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द वापरताना अनेकांकडून अनेकदा चूक होते. तो शब्द नेमका कसा वापरायचा आणि त्या दोन्ही शब्दांचा अर्थ काय हे आपल्याला आता समजलं आहेच._
===============
_*महाराष्ट्र शिक्षक पँनल MSP*_
===============
0 Comments