कोणत्‍या विद्यार्थ्‍यांना अंडी खायला द्यायची आणि कोणत्‍या विद्यार्थ्‍यांना नाही ? आता असे ठरवले जाणार ! शासनाचा GR पहा...24/01/2024




कोणाला अंडी खायला देणार ?

शासनाने दि.२४ जानेवारी 2024 रोजी नवीन जीआर काढला असून त्यानुसार सदरील नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळा स्तरावर देण्यात येणाऱ्या लाभाबाबत संबंधित पालकाने त्याच्या पाल्यास अंडी खाण्यास सहमती दर्शविल्यास सदर पाल्याच्या ओळखपत्रावर स्पष्ट दिसेल असा लाल रंगाचा ठिपका देण्यात यावा तसेच जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा ज्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास अंडी खाण्यास सहमती दर्शविलेली नाही अशा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरव्या रंगाचा ठिपका देण्यात यावा. जेणेकरून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहारा मध्ये अंडी व केळी यांचा लाभ देतांना सुलभता येईल असे जीआर मध्ये नमूद करण्यात आले आहे.

याचाच अर्थ जे विद्यार्थी अंडी खातात त्यांना अंडी देण्यात येतील आणि जे अंडी खात नाहीत त्यांना केळी किंवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ देण्यात येणार आहे. शिवाय अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्डवर लाल रंगाचा ठिपका आणि अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्डवर हिरव्या रंगाचा ठिपका देण्यात येणार आहे. जेणेकरून दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ देण्यात अडचण येणार नाही.

Post a Comment

0 Comments