प्रति,
मुख्याध्यापक,
सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन,
सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद, औरंगाबाद.
विषयः प्रत्येक शाळेत महाराष्ट्मोटार वाहन (स्कुल बस करीता विनियम) नियम 2011 नुसार शालेय परिहवन समिती स्थापन करणेबाबत.
संदर्भ: महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बस करीता विनियम) नियम 2011.
उपरोक्त संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आपल्या शाळेतील विदयार्थी वाहनाने शाळेत येणे जाणे करत असतील किंवा नसतील तरी आपल्या शाळेत शालेय परिवहन समिती, महाराष्ट्रमोटार वाहन (स्कुल बस करीता विनियम) नियम 2011 नुसार स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच सदर नियमावाली नुसार शाळेत शालेय परिवहन समितीचे व विदयार्थी वाहतुकी बाबत कामकाज करावे.
सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत दिलेल्या निकषानुसार परिवहन समितीची स्थापना शाळेत करण्यात यावी. विदद्यार्थी वाहतुकीसाठी शाळेने बस किंवा इतर साधने लावलेली असतील त्यांची पार्किंगची व्यवस्था शालेय प्रशासनाने करावी. रस्त्यावर वाहने पार्क करु नयेत. वाहतुक नियोजनाची स्वतंत्र जबाबदारी शाळेतील एका शिक्षकावर सोपवावी. शालेय परिवहन साठी वापरण्यात येणा-या वाहनामध्ये CCTV यंत्रणा असावी.
बसचालक/मदतनीस यांचे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे. बसचालक / मदतनीस व्यसनी असु नयेत. चारित्र्य प्रमाणपत्र शाळेकडे प्राप्त झाल्यानंतरच बसचालक/मदतनीस यांची नेमणूक करण्यात यावी.
शालेय परिवहन समितीच्या शाळेत नियमित बैठका घेण्यात याव्यात. RTO कार्यालयाच्या प्रतिनिधींचा शालेय परिवहन समितीत समावेश करावा. त्यांना वेळोवेळी बैठकीसाठी निंमत्रीत करावे. स्कुल बस / वाहनांची RTO कार्यालया मार्फत नियमित तपासणी करुन घ्यावी. परिवहन साधनात क्षमतेपेक्षा जास्त विदयार्थी बसवू नयेत. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 अ दिनांक 22 मार्च 2011 नूसार सर्व नियमांचे पालन करावे.
Манв (अश्विनी लाठकरे) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, औरंगाबाद.
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, औरंगाबाद.
प्रतिलिपीः गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व आपल्या तालुक्यातील शाळांची बैठक घेउन वरील सूचनेनुसार कार्यवाही करुन घ्यावी.
0 Comments