संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/पदस्थापना करणेबाबत.

अति तात्काळ / महत्वाचे

पुणे जिल्हा परिषद, पुणे
शिक्षण विभाग (प्राथमिक) नवीन प्रशासकीय इमारत वेलस्ली रोड, कॅम्प, पुणे -०१
जा.क्र. शिक्षण/प्राथ-१/से-१/२२४३/२०२४

दिनांक :- २४/१२/२०२४.

प्रति,
१. गटविकारस अधिकारी, पंचायत समिती (सर्व) जि.पुणे
२. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) जि.पुणे

विषय - संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/पदस्थापना करणेबाबत.

संदर्भ -

१. ग्रामविकास विभाग शासन निर्णय पत्र क्र. जिपब-५११/प्र.क्र.५४/आस्था-१४ दि.१८/०५/२०११.
२. ग्रामविकास विभाग शासन शुध्दीपत्रक पत्र क्र. जिपव-५११/प्र.क्र.५४/आस्था- १४दि.२७/०४/२०१२.
३. ग्रामविकास विभाग शासन निर्णय पत्र क्र. जिपव-३१२१/प्र.क्र.६८/आस्था-१४ दि.२८/०८/२०१२.
४. ग्राविकास विभागाकडील पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२१/आस्था-१४ दि.१०/०६/२०२२.

उपरोक्त संदर्भ क्र.१ अन्वये सन-२०२३-२०२४ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/पदसथापना करणे बाबात सूचना आहेत.

त्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/ पदस्थापना करणेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहे. संदर्भ क्र. २ व ३ सन-२०२३-२४ मधील शाळामध्ये संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन / पदस्थापना करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानुसार संदर्भ क्र. २,३ व ४ शासन निर्णयान्वये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत दि.०२/०१/२०२५ पर्यंत कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा.

श्री. संजय नाईकडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद, पुणे

Post a Comment

0 Comments