जा.क्र.राशैसंप्रपम/सा.शा/वी.बा.दि/२०२४/०6058
दि.१६/१२/२०२४
प्रति.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४) शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक/ योजना सर्व
५) शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण व उत्तर), मुंबई
६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा.सर्व
विषयः २६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवर "वीर बाल दिवस" साजरा करण्याबाबत.
संदर्भ : शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र D.N.No: १७- ९/२०२३-Coord दि.१३ डिसेंबर २०२४
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, भारताच्या भविष्याचा पाया असलेल्या बालकांना सन्मानित करण्यासाठी, २६ डिसेंबर, २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवरील वीर बाल दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी वीर बाल दिवसाची संकल्पना "वीरता" असणार आहे, ज्यामध्ये बालकांनी दाखवलेले धैर्य, दया आणि लवचिकता यांचा समावेश आहे.
सदर उपक्रम विविध कार्यक्रमाच्या आधारे देशभरात एक आठवडाभर चालणार आहे. ज्याचा मुख्य कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर, २०२४ रोजी भारत सरकारचे माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर कार्यक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे. दिनांक १६ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमाची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचेकडून पाठविण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणेः
१. वयोगटानुसार स्पर्धाः मूलभूत टप्पा (६-८ वर्षे) आणि प्राथमिक टप्पा (८-११ वर्षे):
चित्रकला, निबंध लेखन आणि कथाकथन विषयः
• मला काय आनंदित करते
मध्यम टप्पा (११-१४ वर्षे) आणि माध्यमिक टप्पा (१४-१८ वर्षे):
निबंध, कविता, वादविवाद आणि डिजिटल सादरीकरण विषयः
• राष्ट्रनिर्माणात मुलांची भूमिका
• विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन
२. पीएमआरबीपी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचा संपर्कः शालेय परिपाठामध्ये किंवा विशेष सत्रांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्तकर्त्यांच्या प्रेरणादायी कथा सादर करणे.
३. ऑनलाइन स्पर्धाः MyGov/MyBharat या पोर्टलवर कथाकथन, सर्जनशील लेखन, पोस्टर बनवणे आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धांमध्ये सहभाग घेणे.
त्यानुसार, २६ डिसेंबर २०२४ हा दिवस "वीर बाल दिवस" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे. सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांनी दिलेल्या ट्रॅकरमध्ये त्याचा अहवाल भरण्यात यावा.
https://docs.google.com/spreadsheets/d/1iLGN2m09Htucz1RpCeDpRBBSF
Oa4436aYUW4CYAKM/edit?usp=sharing सदर ट्रॅकरवर कार्यक्रमांच्या छोटे व्हिडिओ आणि उच्च-रिझोल्यूशन फोटोग्राफ अपलोड करण्यात यावेत. तसेच सदर उपक्रमासंदर्भात काही अडचण आल्यास राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव, उपविभागप्रमुख, सामाजिक शास्त्र विभाग (मो.क्र. ९४२३५३७९२७) यांचेशी संपर्क करावा.
(अनुराधा ओक)सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०.
प्रत माहितीस्तवः
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई
मा. आयुक्त, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद, मुंबई
0 Comments