जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभाग
चेलीपुरा हायस्कूल, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर
E-mail: ssampspabad@yahoo.co.in
जा.क्र.जि.प.छ.सं. शिक्षण विभाग/प्राथ.SS/2024-25/7512
दिनांक: 05/12/2024
प्रति,
1. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
2. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जिल्हा छत्रपती संभाजीनगर (सर्व),
विषय : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत.
संदर्भ
: 1. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकिर्ण- २०२४/प्र.क्र.२७/एस.डी.-४ दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२४
2 दिव्य मराठी वृत्तमानपत्रात छापून आलेली बातमी दिनांक ०४/१२/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयी निर्देशित करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळांना संदर्भीय शासकीय परिपत्रका मधील सुचनांचे सक्त पालन करून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या / माध्यमाच्या शाळांमधील पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किवा ९ नंतर भरविण्याबाबत सर्व शाळांना पुनश्च निर्देशित करावे,
शाळांकडून संदर्भीय शासकीय परिपत्रका मधील सुचनांचे पालन होत असल्याची खात्री करावी. शहरातील शाळेच्या वेळा बदलताना गर्दा टाळण्याच्या दृष्टीने शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा समांतर येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सोबत : संदर्भीय शासन परिपत्रक.
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
0 Comments