प्रति,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व) जिल्हा छत्रपती संभाजीनगर
विषय :- शाळास्तरावर त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा/पालक परिषदेचे आयोजन करणेबाबत.
संदर्भ :- शासन निर्णय संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७९/एस डी-६ मधील मुद्दा क्र ६, ८ नुसार २७ ऑक्टोंबर २०२१
उपरोक्त संदर्भीय निर्देशित करण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६ - २७ पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच प्राधान्य देण्यात आले आहे. संदर्भीय शासन निर्णयातील मधील मुद्दा क्र ६ ते ८ नुसार विद्यार्थी, पालक, शाळा शिक्षक व समाज या सर्वांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे.
मुलांना घरी शिकण्यासाठी पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांचे स्वयंशिक्षण प्रभावी करण्यासाठी शाळेसोबत घरी पूरक वातावरण असणे गरजेचे आहे. पालक आणि मुल एकत्र (सोबत) बसून विद्यार्थ्यांनी कोणत्या कृती कराव्यात याबाबत शिकण्यामध्ये पालकांची प्रेरणा महत्वाची असते. पालकामध्ये जागरुकता असेल तर मुलांच्या शिक्षणामध्ये सहकार्य वाढेल व त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. शिक्षणमित्र, अभ्यास मित्र ही संकल्पना यायची असेल तर त्यामध्ये पालकांची जागरुकता अतिशय महत्वाची आहे.
त्यासाठी सर्व शाळेमध्ये त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठकीचे आयोजन करावे. त्यामध्ये गृह अध्यापन आणि स्वयंशिक्षण अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सक्रीयतेसाठी त्यांना प्रोत्साहन व पाठिंबा देणेकरिता पालकांचे उध्बोधन होवून त्यांचा सहभाग वाढवावा. यासाठी सोबत दिलेल्या त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठक मार्गदर्शिकेचा आधार घ्यावा. गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांनी लिंक मध्ये माहिती भरल्याची खात्री करावी तसेच तालुका स्तरावरून पालक आढावा बैठकीला भेटीचे नियोजन करावे.
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळास्तरावर त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठकीचे आयोजन करून बैठकीची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक / शिक्षक यांनी https://forms.gle/1s1Ckvq971Q7hKBg8 या गुगल लिंक मध्ये भरावी. सोबत :- शैक्षणिक पालक आढावा बैठक मार्गदर्शिका
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
प्रतिलिपी :
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सविनय सादर.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
शैक्षणिक पालक आढावा बैठक
प्रस्तावना
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच प्राध्यान्य देण्यात आले आहे. २७ ऑक्टोंबर २०२१ शासन निर्णय संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७९ / एस डी-६ मधील मुद्दा क्र ६,८ नुसार विद्यार्थी, पालक, शाळा शिक्षक व समाज या सर्वांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने "समग्र शिक्षा "मध्ये निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे इयता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ प्राप्त करण्याचे लक्ष निधारित केले आहे. या अभियानात विद्यार्थी पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वकष पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी घरी शिकणे यामध्ये पालकांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी शाळेने शाळेमध्ये त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठकीचे आयोजन करून त्यामध्ये गृह अध्यापन आणि स्वयंशिक्षण अंतर्गत शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठिंबा देणे यासाठी पालकांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.
त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठक का? कशासाठी?
• मुलांचा सामाजिक, भावनिक, शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग
• पालकाकडून मुल समजून घेऊन व त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षक व पालक यांचे एकत्रित नियोजन
• मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी समन्वयाने सोडवण्यासाठी.
• मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक एकत्रित नियोजन
• मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळांमधील शिक्षण आणि सभोवताली मिळणारे अनुभव याची जोडणी परिणामकारक ठरते.
• शासनाने निर्गमित केल्यानुसार वयोनुरूप प्रत्येक बालकांच्या अध्ययन क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांचा सक्रीय सहभाग असणे खूप महत्वपूर्ण आहे.
काय साध्य होईल?
• उपस्थित सर्व पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी नेमकी माहिती मिळू शकेल.
• स्थानिक पालकांच्या सहभागातून मुलांच्या क्षमतांचा विकास साधला जाईल.
• शिक्षक आणि पालक एकत्रित मिळून किमान ३ महिन्याचे नियोजन होईल.
• ठराविक कालावधीत समस्या सोडवण्यासाठी जबाबदारीचे वाटप होईल.
• पालक त्यांची भूमिका समजून घेऊन काम करतील.
शिक्षकांनी त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठक प्रक्रीयेपूर्वीची तयारी :-
• बैठकीची वेळ ठरविणे.
• बैठकीच्या विषयांची जबाबदारी शिक्षकानी घेणे.
• बैठकीचे शाळा हे स्थळ निश्चित करणे.
• विषयांच्या अनुषंगाने पोस्टर्स लावणे
• मुलांच्या पोर्ट फ़ोलिओ फाईल तयार करणे
• मुलांच्या नोंदी केलेले रजिस्टर, कार्ड तयार करणे
• इयत्तेनुसार मुलांच्या क्षमतांची नोट लावणे.
पालक संपर्क :-
• पालक बैठकीचे नियोजन झाल्यावर पालकांशी संपर्क करणे.
• पालकांना पालक बैठकीचा अजेंडा देणे
• पालक बैठकीसाठी येण्यास प्रेरित करणे
• शाळा व्यवस्थापन समितीशी संपर्क
• समितीच्या सर्व सदस्यांना पूर्व कल्पना देणे.
• ग्रामपंचायत संपर्क
• ग्रामपंचायतीमध्ये लेखी स्वरूपात पालक बैठकीची सूचना देणे.
त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठकीमध्ये :-
• गावातील मुलांच्या गुण कौशल्याचा (त्याच्या परिसरातील परिस्थिती नुसार) शोध घेऊन त्यांच्या गुण कौशल्याची मांडणी पालक परिषदेमध्ये करावी.
• गावस्तरावर उपलब्ध सांकृतिक व मनोरंजन साधनांनुसार मुलांच्या शिक्षणविषयी जागृतीसाठी वापर करणे तसेच यांचा व्हिडेओ तयार करून शिक्षण परिषद व पालक आढावा बैठकीमध्ये मांडणी करणे.
• मुले शिकून पुढे काय करू शकतात व त्याच्या जीवनामध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी स्थानिक परिस्थितीतील उदाहरण देऊन त्याचे यशोगाथा किवा व्हिडीओ चे सादरीकरण करावे उदा. (डॉ राजेंद्र भारुड साहेब)
• पालक मुलांबरोबर घरी नियमीतपणे कोणत्या कृती करू शकतात त्याची यादी तयार करून पालकांना प्रोत्साहन दिले जाऊ शकते. (काही सोप्या कृती, चिठ्ठया (लेबल) वाचणे, वर्तमानपत्रातील, नोटांवरील, कॅलेंडरवरील शब्द वाचणे तसेच पुस्तके वाचणे, खेळ खेळणे, गाणी व कविता म्हणणे, आवाजातील योग्य चढ उतारासह गोष्टी सांगणे व मुलांबरोबर संवाद साधणे. छापील साहित्याबरोबरच जे पालक शिकण्याचे अन्य साहित्य प्राप्त करू शकतात)
• गाव/मोहल्ला/वस्ती या स्तरावर अभ्यास गट गठित करून यामध्ये लहान मुलांमध्ये वाचन, आकलन, लेखन व संख्या आकलन सुधारावे, यासाठी गावातील उच्च माध्यमिक स्तरावरील/पदवीधर विद्यार्थी आणि लहान मुलांच्या छोट्या छोट्या गटामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी नियोजन
• स्थानिक समारंभाचा वापर व त्याद्वारे शिक्षणाचा वेगळेपणा
• गावस्तरावर व्यावसायिक मार्गदर्शन (पेंटींग, नृत्य, शासकीय योजनाची माहिती देणे, कमी शिकलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी
• मुल निहाय नोंदी बनविणे, पोर्ट फोलिओ फाईल च्या माध्यमातून मुलांनी केलेल्या कामाची मांडणी
त्रैमासिक शैक्षणिक पालक आढावा बैठकीनंतर :-
• गावामध्ये शालेय मेळावा, क्षेत्रभेट, पुस्तक जत्रा, वाचनाचे कार्यक्रम, शिक्षणाविषयी जागरुकता, शैक्षणिक ग्रामसभेचे आयोजन
• मुलांना व्यवहारीक ज्ञान मिळविण्यासाठीचे नियोजन (शिवार फेरी, गावातील बलुतेदार, कारखाने, गणिती क्रिया मुले घरी कसे करू शकतील)
• पुढील ३ महिन्यासाठी शैक्षणिक कृती आराखडा बनविणे
• शाळा व्यवस्थापन समिती मासिक बैठकीमध्ये शैक्षणिक आढावा
• पुढील बैठकीची संभाव्य तारीख निश्चिती
0 Comments