विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत... दि.ळ 27/1/2025

प्रति,
दि. २२ जानेवारी २०२५
२७.०१-२०२५

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. सर्व)

विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत...

संदर्भ: १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. जिल्हा पत्र /२०२४-२५/०४५०२, दि. २४ सप्टेंबर २०२४.
२. प्रस्तुत कार्यालय पत्र जा. क. रागैसंप्रपम/संकीर्ण/इतिवृत्त/२०२४-२५/०५१४६,दि.२३ ऑक्टोबर २०२४.

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.मू.चा.१-VSK/२०२४-२५/५४०९, दि.११ नोव्हेंबर २०२४.
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.मू.चा.१-VSK/२०२४-२५/०५६३६, दि. २७ नोव्हेंबर २०२४.
उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) मूल्यमापनाचे

गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटमध्ये गुण भरण्यासाठी जिल्ह्यांना यापूर्वी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.

तथापि, राज्यातील ९८५१ शाळांच्या विद्यार्थ्याच्या गुणांची नोंद चाटबॉटवर अद्यापही केलेली नाही. विद्यार्थी गुण नोंदविणेकरिता जिल्ह्यांना अंतिम मुदत दि. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. करिता गुणनोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. तसेच यापूर्वी ज्या शाळांनी माहिती भरलेली नाही त्यांनी माहिती भरू नये.
१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक-https://bit.ly/PAΤ-ΜΗ

तसेच १०० टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही व आर्थिक अपव्ययासाठी संबंधित
मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येईल याची उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
सोबत अद्यापही गुणांची नोंद न केलेल्या जिल्हा व शाळांची संख्या व नावे

(राहुल रेखावार था..से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

0 Comments