दिनांक: २८ ऑगस्ट, २०१२
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्यावाबत.
वाचाः १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.जिपब-५११/प्र.क.५४/१४,
दिनांक १८/५/२०११
प्रस्तावना: जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी अपंग आहेत व ज्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत प्राधिकृत प्राधिका-यांचे प्रमाणपत्र सादर केले आहे तसेच जे जिल्हा परिषद कर्मचारी मतिमंद व्यक्ती / मतिमंद मुलांचे पालक आहेत व ज्यांनी संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्यांना सर्वसाधारण बदल्यामधून वगळण्यात आले आहे.
समायोजन प्रक्रिया ही बदलीचाच एक भाग असल्याने याबाबत सुसंमतता राखण्यासाठी अपंगांना बदल्यांमध्ये वगळण्याचे तत्त्व समायोजन प्रक्रीयेलाही लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होली त्याअनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे..
शासन निर्णय अपंग व्यक्ती (समान संभी, संपूर्ण राहभाग व हवकांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ (९९९६ चा १), तसेच त्यानुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, जे कर्मचारी अपंग आहेत य ज्यानी प्राधिकृत प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्यांना समायोजन प्रक्रियेतून वगळण्यात यावे. तसेच काईचारी मतिभव्यक्तिचे मुलांचे पालक आहेत अशा कर्मचाऱ्याऱ्यांनी संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकाचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही समायोजन प्रक्रियेतून पूर्णतः वगळण्यात यावे.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सदर्भाधीन दिनांक १८-५-२०११ च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ४ मधील "अपंग शिक्षक" अनुक्रमांक ६० मधील "क" येथील "अपंग कर्मचारी (अस्थिव्यंग, अल्पदृष्टी वे इतर)" हा उल्लेख वगळण्यात यावा.-
३. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणकीय संकेतांक २०१२०८२८१५१११३१२०१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
(एस.एस संधू)
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन
0 Comments