माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर, अर्धन्यायिक प्रकरणातील सुनावणीसाठी, माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम, द्वितीय अपील केल्यानंतर सुनावणीसाठी पूर्ण 5 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे.

शासकीय कार्यालयात, माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर, अर्धन्यायिक प्रकरणातील सुनावणीसाठी, माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम, द्वितीय अपील केल्यानंतर सुनावणीसाठी पूर्ण 5 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. 
मात्र जाणूनबुजून कायद्याची अवहेलना करून, नोकरदार मध्यमवर्गीय माणसाला, सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना त्रास देण्यासाठी मुजोर भ्रष्ट व्यवस्था, सुनावणीच्या अगोदर 1 किंवा 2 दिवस पत्र पाठवते, किंवा अनेक वेळा सुनावणी झाल्यानंतर, सुनावणी होती याचे पत्र अर्जदाराला मिळते.

*मा.मुबंई उच्च न्यायालय यांनी महाराष्ट्र राज्याला निर्देश दिले आहे की ज्या सर्व प्रकरणांमध्ये वैयक्तिक सुनावणी द्यावी लागेल, त्यांनी प्रत्येक प्रकरणातील सर्व पक्षांना किमान पाच कामकाजाच्या दिवसांची सूचना द्यावी*

२४ तासांपेक्षा कमी सूचना देणे किंवा अल्प सूचना देणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. अशा नोटिसा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यास, हे न्यायालय संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांच्या पगारातून वसूल करण्यासाठी भरीव खर्च लादू शकते, असे त्यांच्या मुख्य सचिवांमार्फत मा. मुबंई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्याला स्पष्ट सूचित केले आहे.
माहितीस्तव सादर
🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments