विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक - ४५२१ "कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या विविध मागण्यांसंदर्भात.."

दिनांक:- ०६ ऑगस्ट, २०२५
प्रति,
१) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई
२) शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

विषय :- विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक - ४५२१
"कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या विविध मागण्यांसंदर्भात."

उपरोक्त विषयाबाबत मा. श्री. निलेश राणे खालीलप्रमाणे अतारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. (कुडाळ), विधानसभा सदस्य यांनी विधानसभेमध्ये

१) (ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग) येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने कुडाळ पंचायत समितीद्वारे विदयार्थ्यानाकरिता तात्काळ गणवेश मिळणे, संच मान्यता जाचक आदेश रद्द करणे, तसेच ऑनलाईन सुविधा शाळांना पुरवल्याशिवाय कामाची सक्ती करु नये अशा विविध मागण्यांसाठी लाक्षणिक धरणे आदोलन माहे डिसेंबर, २०२४ मध्ये वा त्यादरम्यान करण्यात आले हे खरे आहे काय,

२) असल्यास, यासंदर्भात विदयार्थ्यासह शिक्षकांवर देखील अन्याय होऊ नये, यासाठी सहायक गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे ही खरे आहे काय,

३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे

४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

वरील प्रश्नाचे उत्तर पूरक टिप्पणीसह दि.११ ऑगस्ट, २०२५ पूर्वी शासनास पाठविण्यात यावे.

(मोहन आरसेवाड)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तवः-
कक्ष अधिकारी (टि.एन.टि.-२), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

Post a Comment

0 Comments