मंत्री
शालेय शिक्षण
महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
www.maharashtra.gov.in
दिनांक : 30/9/2025
विषय:- महाराष्ट्र विधानपरिषद प्रथम (अर्थसंकल्प) "औचित्याचा मुद्दा" क्र.१११ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत.
संदर्भ:- महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे पत्र क्र.--/म.वि.स./ई-२, दिनांक:-१९.०३.२०२५.
महोदय,
शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ व त्याअनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय यामधील तरतुदीच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २९ तसेच ११ गंभीर आजारांवर रुग्णालयात घेतलेल्या उपचारांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१९.०३.२००५ च्या व इतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही विहित करण्यात आलेली आहे. सदरहू शासन निर्णयास अनुसरुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील शासकीय तसेच १००% अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचे लाभ देण्यात येतात.
२. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव या विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग व वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केले असता, सदर योजनेशी समरुप योजना (आयुष्मान भारत योजना, महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना इ). केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. तसेच राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संख्या विचारात घेता सद्यस्थितीत सदर योजना राबविण्यास नियोजन विभाग व वित्त विभागाने असहमती दर्शवली असल्याने सदर योजना राज्यात लागू करणे तूर्तास शक्य नाही.
उपरोक्तप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग चे अभिप्राय विचारात घेता सदर योजना राज्यात लागू करणे तूर्तास शक्य नाही. ३.
आपला
(दादाजी भुसे)
मा. श्री. किशोर दराडे,
विधानपरिषद सदस्य,
विधानभवन, मुंबई-३२.
प्रत - माहितीसाठी,
१. कक्ष अधिकारी (ई-२), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
२. कक्ष अधिकारी (समन्वय), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
0 Comments