दि. १२/२/२०२६
विषय :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार बालकांचा शाळांमधील प्रवेशाच्या राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत
संदर्भ :- शासन निर्णय क्र. आरटीई-२०२५/प्र.क्र.०८/एसडी-१, दि. १२/२/२०२६
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयाव्दारे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १२ (सी) (१) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबतची कार्यपध्दती विशद करण्यात आलेली असून संपूर्ण राज्यात सदरची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबतचे निर्देश सदर शासन निर्णयाव्दारे देण्यात आलेले आहेत.
सदर शासन प्राप्त निर्देशानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ कलम १२ (सी) (१) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना ऑनलाईन लिंक दि.१७/२/२०२६ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी. शासन निर्णयातील तरतुदीनुसार बालकांच्या पालकांकडून RTE २५ टक्के ऑनलाईन फॉर्म भरतेवळी खालील कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात यावी.
१. बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य)
२. भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोदंणीकृत भाडे करारनाम्याची प्रत (आवश्यक) (सर्व घटकांना अनिवार्य)
३. सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य)
(परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.)
४. आर्थिक दुर्बल घटकातील विदयार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रुपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न), तसेच
पालकांना त्यांचे रहिवासाचे स्थान गुगल मॅप मध्ये दर्शविताना GPS मध्ये बलुन Land mark च्या १ किमी. च्या मर्यादेत दाखविण्याची मुभा असेल, याबाबत व्यवस्था करावी.
आर.टी.ई. २५ टक्के अंतर्गत Online प्रवेश अर्ज भरत असतांना पालकांना पाल्याच्या प्रवेशाकरिता जास्तीत जास्त कोणत्याही १० शाळांचे पर्याय देता येतील. यामध्ये पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या पाल्याच्या निवास स्थानापासून १ किमी व त्याच्या आतील शाळा दर्शविण्याची व्यवस्थ्क्षा करावी.
शासन निर्णय दि.१८/९/२०२० नुसार RTE २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय पुढीलप्रमाणे असेल.
1) प्रवेशाचा वर्ग प्ले ग्रुप/नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३+ ३ रा वर्ग)
किमान वय वर्ष 3+
वयाबाबत मानीव दिनांक-31डिसेंबर
2) प्रवेशाचा वर्ग- 1ली
किमान वय वर्ष- 6+
वयाबाबत मानीव दिनांक- 31 डिसेंबर
शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
शरद गोसावी
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
0 Comments