सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत

दिनांक/०४/२०२६

परिपत्रक -

विषय : सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत

संदर्भ :-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय क्र. माशाव्य १२०४ (११४/०४) माशि-३, दि.११ जून, २००४

२) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, म.शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र.विपप्र-२०२५/प्र.क्र.१०८/एस.एम-६, दि.१ जुलै, २०२५

३) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/संकीर्ण-८०२/माशाव्य/२०२५/१३९३२०४, दि.२६/०८/२०२५

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भ क्र. २ चे शासनाचे निर्देशानुसार, संचालनालयाने शासन निर्णय दि.११ जून, २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत संदर्भ क्र.३ चे परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकानुसार याअनुषंगाने शासन निर्णय दि. ११ जून, २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पुनश्च निर्देश देण्यात येत आहे.

सदरील विषयाचे गांभीर्य पाहता सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. याबाबतच्या सूचना सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना दयाव्यात. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करुन तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी.

राज्य मंडळ, C.B.S.E., I.C.S.E. मंडळाच्या शाळांनी N(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे CERT / SCERT (बालभारतीची) पाठयपुस्तके वापरावीत. अन्य मंडळांच्या शाळांनी त्या त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन / सक्ती विद्यार्थ्यांवर करु नये.

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करुन तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी.

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

 (डॉ. महेश पालकर)शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

Post a Comment

0 Comments