शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.
दूरध्वनी : (020) 24530396
e-mail: doesecondary1@gmail.com
क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी
दिनांक Digital Sign Date
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षण निरीक्षक, उत्तर/दक्षिण/पश्चिम, मुंबई
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) सर्व.
संदर्भ- १. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४, दि. २७/३/२०२६
२. वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/ कोषा प्रशा-४, दि. २३/४/२०२६
३. मा. प्रधान सचिव, वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि.२८/७/२०२६ रोजी आढावा बैठकीत दिलेले निर्देश.
४. संचालनालयाचे पत्र.क्र. क्र. शिसंमा/२०२६/टि-६ बि/ई-केवायसी, दि.३१.०७.२०२६.
५. संचालनालयाचे पत्र.क्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी शिसंमा/दि १९/०८/२०२६
६. मा. आयुक्त (शिक्षण) यांनी दिलेल्या सुचना
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ अन्वये सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संदर्भ क्र. ५ अन्वये माहे दि.२० सप्टेंबर, २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणेबाबत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
तथापि क्षेत्रियस्तरावर शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेताला असता, सदर कामासाठी काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे ई-केवायसी दि.५ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.
दि.५ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर, २०२६ चे वेतन देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये आहरित करण्यात येणार नाही. शालार्थ प्रणालीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सर्व शाळांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रतः माहितीस्तव सविनय सादर-
१) मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
२) अवर सचिव (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सर्व
प्रत. श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई यांना प्रत देऊन कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमधून वेतन घेणा-या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे ई-केवायसी करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय माहे ऑक्टोबर, २०२६ चे देय नोव्हेंबर, २०२६ मध्ये वेतन देयक तयार होणार नाही याबाबत व्हॅलीडेशन देण्यात यावा.
0 Comments