अध्ययन निष्पत्ती साधू या..!🥀चला वर्ग प्रगत करु या..!!

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

 〇 *अध्ययन निष्पत्ती साधू या..!!* 〇  
  *🥀चला वर्ग प्रगत करु या..!!*
        ════════════════
 *_चला तर मग... !!!_*
         *_लपाक्षरी खेळू या.. !!!_*   
        _(लपलेला शब्द शोधू या)_
━━━━━━━━━━━━━━━━
      लपाक्षरी या भाषिक खेळातून संकेतावरुन शब्द शोधता येतो. या उपक्रमातून शब्दसंपत्तीची वाढ होते.
*_भाषिक उपक्रमासाठी सुचना_*
*===================*
🥀हा भाषिक कितीही मुलांना खेळता येईल.
🥀हा भाषिक खेळ व्यक्तिग किंवा गटात खेळता येतो.
🥀 खालील ओळींमधील सुचना वरुन शब्दांची लपलेले अक्षरे शोधायची आहेत.
🥀ती नीट लावलीत की त्यात लपलेला एक शब्द मिळेल.
🥀त्या शब्दाचा अर्थही त्या ओळींमध्येच दिलेला आहे.
🥀पाहु या सर्वात आधी कोण सर्व शब्द ओळखतो ते!.

उदाहरणार्थ :-
🌈 मी आहे मोठं शहर.
          नावात माझ्या अक्षरे चार.
   पहिले - दुसरे घेतले तर ज्या अवयवाने येते ऐकू. *_:- कान_*
  तिसऱ्या आणि चौथ्याने नदी लागे फुगू. *_:- पूर._*
म्हणजेच *_उत्तर :-कान+पूर=कानपूर_*
               चला तर मग खालील वाक्यात लपलेला शब्द शोधू या.
१)मी आहे दगड, अग्नी उत्पन्न करतो मी.
👉 पहिले - दुसरे अक्षर, स्पर्श करते थंडगार.
  आणि तिसरे-चौथे अक्षर, लहान मुलांचे खेळणे.
असा मी चार अक्षरी दगड पण सुंदर खरा! सांगा मी कोण?
२)मी आहे एक पक्षी.
   पाच अक्षरी माझे नाव
   पहिले आणि पाचवे अक्षर
   शरीराचा एक अवयव
   दुसरे व तिसरे अक्षर देते एक धान्य छान!
  तिसरे आणि दुसरे अक्षर म्हणजे कार्य होय!
तिसरे आणि पाचवे अक्षर म्हणजे एक रंग!
         मी कोण सांगाल का,
       की झालात नुसतेच दंग.
३)मी आहे एक शहर, चार अक्षरांचे माझे नाव
  पहिली दोन अक्षरे, कडाडतात आभाळात
   शेवटची दोन घेतली तर
   फोफावते नदी पावसाळ्यात.
४)मी आहे सगळयांजवळ अक्षरे माझ्यात तीन.
पहिले आहे कानात पण नाही आहे मनात
दुसरे आहे मनात पण नाही आहे कानात
तिसरे आहे कानातही आणि मनातही
पण नाही डोक्यात, सांगा बरं मी कोण.
५) मी आहे एक ग्रंथ
    चार अक्षरी माझे नाव
    पहिले, तिसरे अक्षर घेता
   किंमत येईल ठरवता
   दुसरे, तिसरे, चौथे अक्षर चारा आहे प्राण्यांचा
पहिले, चौथे अक्षर घेता
जेवणाची होई आठवण
  सांगा सांगा मी कोण?
          वरील लपाक्षरी या भाषिक खेळातून हसतखेळत शब्दांचा संग्रह वाढवता येतो.
                *_उत्तरे_*
१)गारगोटी.     २)डोमकावळा.
३)विजापूर.      ४)कामना.
             ५)भागवत.

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments