आजच्या शैक्षणिक घडामोडी

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

*•═════•♍💲🅿•═════•*

*🙆‍♂अकार्यक्षम शासकीय कर्मचार्‍यांना देणार नारळ!*

═══════🦋🦋═══════

*📖संख्यावाचनाची नवी पद्धत वापरू नये*

═══════🦋🦋═══════

*👨‍🏫419 शिक्षकांच्या समुपदेशनाने बदल्या*

═══════🦋🦋═══════

*🙆‍♂अकार्यक्षम शासकीय कर्मचार्‍यांना देणार नारळ!*

~~~~~~~~ *srkoil*~~~~~~~~

Published On: Jun 23 2019 1:36AM

मुंबई : चंदन शिरवाळे


*वयाची 50 ते 55 वर्षे पूर्ण किंवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या कामाचा पुढील आठवड्यापासून आढावा घेतला जाणार आहे. अकार्यक्षम कर्मचार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे चार लाख कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर टांगती तलवार आहे.*


राज्यात सध्या 19 लाख सरकारी व निमसरकारी कर्मचारी व अधिकारी आहेत. त्यामध्ये तीस वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या सुमारे चार लाख कर्मचार्‍यांचा समावेश आहे. शासनाची अधिकाधिक कामे संगणकाद्वारे केली जात असतानाही अनेक कर्मचार्‍यांकडून अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे वयाची 50 ते 55 वर्षे पूर्ण किंवा 30 वर्षे सेवा झालेल्या सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांचा त्यांच्या सेवापुस्तिकांच्या आधारे कामाचा आढावा घेतला जाणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत नुकताच आदेश काढला आहे. अकार्यक्षम आढळणार्‍यांना सेवेतून कमी केले जाणार आहे.


*शारीरिक क्षमता, प्रकृती, कामाची सचोटी हे कार्यक्षमतेचे निकष*


गट ‘अ’ आणि ‘ब’ राजपत्रित व अराजपत्रित अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेताना त्यांची शारीरिक क्षमता, प्रकृतीमान, कामाच्या सचोटीबाबतचा गोपनीय अहवाल विचारात घेतला जाईल. तर गट ‘ड’मधील कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक अभिप्रायाचा विचार केला जाईल. पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवेत पात्र ठरणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना सेवेत कायम ठेवण्याबाबतची शिफारस अंतिम निर्णयासाठी विभागीय पुनर्विलोकन समितीकडे पाठवली जाईल. अपात्र कर्मचार्‍यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तीन महिन्यांची नोटीस पाठवली जाणार आहे.एखाद्या कर्मचार्‍याने नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यास, दोन राजपत्रित अधिकार्‍यांच्या समक्ष त्याचा नकार नोंदवून घेतला जाईल व त्याच्या घरी नोटीस पोस्टाने पाठवली जाईल. त्याने ही नोटीसही स्वीकारली नाही, तर दुसर्‍या दिवशी दुपारपासून ही नोटीस त्याला लागू केली जाणार आहे.


*असा घेणार कार्यक्षमतेचा आढावा*


     वयाच्या 35 व्या वर्षी शासन सेवेत आलेल्या गट ‘अ’ आणि ‘ब’च्या राजपत्रित अधिकार्‍यांच्या वयाची 50 वर्षे पूर्ण होतेवेळी किंवा सेवेची 30 वर्षे पूर्ण होतेवेळी एकदाच आढावा घेतला जाईल.

     वयाच्या 35 व्या वर्षांनंतर सेवेत दाखल झालेल्या राजपत्रित अधिकार्‍यांचा वयाच्या 55 व्या वर्षी आढावा.

     गट ‘ब’ अराजपत्रित, गट ‘क’ व गट ‘ड’ कर्मचार्‍यांचा वयाच्या 55 व्या वर्षी किंवा सेवेची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आढावा.

     1 ऑगस्ट रोजी वयाची 49 ते 54 वर्षे किंवा सेवेची 30 वर्षे पूर्ण करणार्‍यांची यादी तयार करण्याचे निर्देश.

     31 मार्चपर्यंतचा गोपनीय अहवाल तयार करण्याच्या सूचना.

     कामाचा आढावा घेण्यासाठी विभागीय व विशेष पुनर्विलोकन समित्या स्थापन.

*•═════•♍💲🅿•═════•*

*📖संख्यावाचनाची नवी पद्धत वापरू नये*

~~~~~~~~ *srkoil*~~~~~~~~

Published On: Jun 23 2019 1:14AM 


पुणे : प्रतिनिधी


राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे गणितातील संख्यावाचन कसे असावे, याचा शासन निर्णय आहे. सध्या या शासन निर्णयाप्रमाणेच संख्यावाचन सुरू आहे. परंतु, *बालभारतीने संख्यावाचनाची काढलेली नवीन पद्धत अत्यंत चुकीची आहे. नवीन पद्धतीमुळे मराठी भाषेत अनागोंदी माजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ही संख्यावाचनाची पद्धत वापरू नये, अशा प्रकारचे पत्र बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांना दिले असल्याची माहिती अनिल गोरे (मराठी काका) यांनी दिली आहे. गोरे हे राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर सदस्य आहेत. अनिल गोरे स्वत: गणिततज्ज्ञही आहेत. ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या शिकवण्या घेतात.*


गोरे म्हणाले, पहिलीतून दुसरीत गेलेल्या विद्यार्थ्यांना शेकडो जोडाक्षरे गणिताच्या पाठ्यपुस्तकात दिली आहेत. इष्टिकाचिती, वृत्तचिती, वक्रपृष्ठभाग, पेन्सिल, त्रिकोण, शून्याची स्थानिक किंमत, विस्तारित, एककस्थानी संख्या, आकृतिबंध, क्रीडास्पर्धा ही मराठी व स्टिकर्स, टूथपेस्ट, कार्डपेपर, आईस्क्रीमचा ही इंग्लिश जोडाक्षरे अशी तब्बल एक हजारहून अधिक जोडाक्षरे दुसरीच्या गणित पाठ्यपुस्तकात आहेत. ती मुलांना वाचणे शक्य नाहीत. त्यामुळे अगोदर ती वगळणे गरजेची आहेत. संख्या वाचनाबाबत अठ्ठावीसऐवजी वीस आठ, सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, अशी सूचना शिक्षकांसाठी करण्यात आली आहे. संख्या वाचनाची ही नवी पद्धत विद्यार्थ्यांना संख्यावाचन सुलभ होण्यात उपयुक्‍त ठरेल की नाही, यावर खूप मतमतांतरे आहेत. केलेला बदल अतिशय उपयुक्‍त आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजभाषेचेच नव्हे संपूर्ण भारताचे भाषिक सौष्ठव, अनमोल लेणी असलेली जोडाक्षरे यामुळे मुलांच्या मनात गणिताची नावड व भीती निर्माण होते हे अति आत्मविश्‍वासपूर्ण विधान वादाचे मूळ आहे. आली लहर, केला कहर या अविचारामुळे ज्याला सध्या अनावश्यक वाद सांगितले जात आहे, तोच खरा वादाचा विषय झाला आहे.


*शिक्षकांसाठी शुद्धीपत्रक काढणे गरजेचे*


नवी सुचवलेली पद्धत केवळ आजवरच्या संख्यावाचन पद्धतीशी जुळवून घेण्याकरता, केवळ एक समजावण्याची पद्धत आहे, असे सांगितले जाते. परंतु, शिक्षकांसाठी सूचना या चौकटीतील वाक्ये, विधाने मात्र विसंगत, विपर्यस्त आहेत. या चौकटीतील विधानांचा आढावा घेऊन शिक्षकांसाठी शुद्धीपत्रक काढणे गरजेचे आहे. राज्य शासनाने मराठी राजभाषेतील एक ते शंभर व त्यापुढील संख्यावाचन कसे करावे, हे निश्‍चित केले आहे. मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके, इतर माध्यमाची मराठी पाठ्यपुस्तके, मराठीतील छापील आशय अशा मजकुरांमध्ये, शासकीय, निमशासकीय, शासनप्रणीत उपक्रमांमधील कामकाजाशी संबंधित आशयात मराठी संख्यांचे वाचन, लेखन कसे करावे, याचे स्पष्ट आदेश शासन निर्णयाद्वारे पूर्वीच देण्यात आले आहेत.


*नवी पद्धत आवश्यक आहे का, याचा विचार व्हावा*


दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात शासन निर्णयाशी विसंगत संख्या वाचनाची पद्धत आहे. शासन निर्णयातील संख्यावाचन पद्धतीनुसार संख्यावाचन व संबोध अधिक स्पष्ट व्हावेत, सुलभ होण्यासाठी, केवळ समजावण्यासाठी नवी संख्यावाचन पद्धत सुचवल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या संख्यावाचनाची पद्धत ही शासन निर्णयानुसारच सुरू आहे. त्यामुळे नवी पद्धत खरंच आवश्यक आहे का, याबाबत व्यापक चर्चा घडवून नवीन पद्धत गणित विषयाचा एक प्रकल्प म्हणून केवळ समजावण्यासाठी वापरता येईल का, याची पडताळणी झाल्याशिवाय नवी पद्धत वापरू नये, असे परिपत्रक शिक्षकांसाठी काढणे गरजेचे आहे.


*नव्या पद्धतीमुळे मराठी लोकव्यवहारात अनागोंदी माजेल*


सुचवलेले बदल केवळ गणितापुरते आहेत. त्याचा भाषा ज्ञानाशी त्याचा संबंध नाही असे बालभारतीचे संचालक डॉ.सुनील मगर सांगतात. परंतु हिंदी राष्ट्रभाषा असल्याच्या अफवेप्रमाणेच गणिताच्या पुस्तकात शिकलेले संख्या वाचन विद्यार्थी केवळ गणितापुरते वापरतील, समाजव्यवहारात नाही याची खात्री देता येत नाही. नवीन संख्या वाचन जुन्या संख्या वाचनाऐवजी करावे असा जो स्पष्ट निर्देश आहे तो बालवयात आत्मसात झाल्यास विद्यार्थी आयुष्यभर सर्व क्षेत्रात ती संख्या वाचन पद्धत वापरू पाहतील व मराठी लोकव्यवहारात अनागोंदी माजेल. भाषेच्या मूलभूत रचनेबाबत इतका महत्त्वाचा निर्णय गणितज्ज्ञ, षातज्ज्ञ, मराठी विषयक संस्थांना सहभागी करून घेऊन करावा. बदलाबाबतची माहिती मराठी भाषा विभाग, मराठी भाषा मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील सर्वोच्च विधिमंडळ यांना द्यावी. त्यावर त्यांची मते जाणून, त्यांच्याकडून मार्गदर्शन व अंतिम निर्णय प्राप्त करून मगच असे बदल सुस्पष्ट निर्देश स्वरूपात पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावेत. तोपर्यंत या नव्या पद्धतीला स्थगिती द्यावी अशी मागणी देखील गोरे यांनी केली आहे

*•═════•♍💲🅿•═════•*

*👨‍🏫419 शिक्षकांच्या समुपदेशनाने बदल्या*

~~~~~~~~ *srkoil*~~~~~~~~

Published On: Jun 23 2019 1:20AM | Last Updated: Jun 23 2019 1:04AM


कोल्हापूर : प्रतिनिधी


रिक्‍त जागा प्रसिद्ध केल्याशिवाय बदलीची प्रक्रिया सुरू करण्यास शिक्षक संघटनांनी केलेला विरोध, रिक्‍त जागा आपल्या लोकांसाठी दडविल्याचा काही शिक्षकांनी केलेला आरोप, न्यायालयात गेलेल्या 68 कर्मचार्‍यांनी 


समुपदेशनाकडे फिरविलेली पाठ आणि अनुपस्थित असलेल्या शिक्षकांच्याही करण्यात आलेल्या बदल्या यामुळे शनिवारी ठेवण्यात आलेली शिक्षक बदल्यांची प्रक्रिया चांगलीच गाजली. समुपदेशन पद्धतीने शनिवारी 419 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.


जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व शिक्षण समिती सभापती अंबरिष घाटगे यांच्या ‘मार्गदर्शना’खाली शिक्षकांच्या बदलीची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, पक्षप्रतोद विजय भोजे उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सुट्टी असूनही जि.प.  गजबजली होती.


सन 2019 मधील बदलीमध्ये विस्थापित झालेले, आंतरजिल्हा बदलीने हजर झालेले व सन 2018 चे विस्थापित शिक्षक यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला. त्यासाठी  19 जून तारीख निश्‍चित केली होती. मात्र, त्या दिवशी अधिकारी नसल्याने समुपदेशन होऊ शकले नाही. शनिवारी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक समिती सभागृहात हे समुपदेशन सकाळी 11 वाजल्यापासून ठेवण्यात आले होते. त्याकरिता सकाळपासूनच शिक्षकांनी गर्दी केली होती.  11 वाजता शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावणे येऊ लागले. त्याला शिक्षक संघटनेचे नेते राजाराम वरुटे, संभाजी बापट, प्रमोद चौंदकर, कृष्णात धनवडे, संभाजी सिद यांनी विरोध केला. जोपर्यंत रिक्‍त जागांची यादी देणार नाही तोपर्यंत समुपदेशन प्रक्रिया सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्याला बदलीसाठी आलेल्या शिक्षकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे सभागृहासमोर एकच गोंधळ झाला. प्रशासनाला नमते घ्यावे लागले. प्रशासनाने रिक्‍त जांगाची यादी दिल्यानंतर समुपदेशन प्रक्रियेस सुरुवात झाली. 


प्रथम महिलांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. शेवटी चुकीची माहिती भरणार्‍या 118 शिक्षकांना सुमदेशनासाठी बोलाविण्यात आले. 132 महिलांना समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 14 महिलांनी नकार दिला. 178 शिक्षकांपैकी 19 जणांनी नकार दिला. चुकीची महिती भरणार्‍या 118 शिक्षकांपैकी 109 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. चुकीची माहिती भरणार्‍या 60 महिलांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 33 महिला अनुपस्थित राहिल्या. तर 49 पुरुषांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 34 जण अनुपस्थित राहिले. तरीही अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या.


*तो शिक्षक कोण?*


एक शिक्षक समुपदेशनासाठी आला होता. त्याने आपले काम झाले आहे. त्यामुळे समुदेशनासाठी जाण्याची मला गरज नाही, असे सांगत तो निघून गेल्याची चर्चा समुपदेशनाच्या ठिकाणी सुरू होती. त्यामुळे समुपदेशनाला न जाता बदली करून घेणारा तो शिक्षक कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


*त्या 68 शिक्षकांच्याही बदल्या*


चुकीची माहिती भरणार्‍या 118 शिक्षकांपैकी 68 शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर दि. 25 जूनला सुनावणी आहे. बदलीसाठी न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा या शिक्षकांचा आहे. त्यामुळे या शिक्षकांनी समुपदेशनाकडे पाठ फिरविली. तरीही ते अनुपस्थित समजून त्यांच्याही बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


*भामटेच्या जागेची भामटेगिरी कुणाची?*


समुपदेशनावेळी एका शिक्षकाला भामटेची जागा दाखविण्यात आली. ती जागा त्याने मागितली. मात्र, त्याला विषयाचे कारण सांगून देण्यास नकार दिला. याच शिक्षकाने पाच वर्षे भाषा विषय असताना सेमीच्या वर्गांना शिकवले होते. त्यानंतर  ही जागा दडविण्यात आल्याचे बोलले जाते. ‘भामटे’च्या जागेची सुमपदेशनात केलेली भामटेगिरी चर्चेचा विषय होता.

═══════🦋🦋═══════

📚 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल 📚*  

👉महाराष्ट्रतील नामांकित शिक्षकांचा सर्वात मोठा शैक्षणिक समुह.

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments