आजच्या शैक्षणिक घडामोडी दि.२४ जून २०१९

*संकलन- भद्रा मारुती हून सतीश कोळी*

जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शिक्षक समिती औरंगाबाद,

.          *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

*•═════•♍💲🅿•═════•*

*🙆‍♂बनावट स्वाक्षरी केल्याने शाळेवर फौजदारी कारवाई*

═══════🦋🦋═══════

*🙆🏻जि.प.शाळांना वयाच्या अटीचा फटका*

═══════🦋🦋═══════

*💉वैद्यकीयची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला*

═══════🦋🦋═══════

*🤷‍♂अण्णाजीऐवजी अंजली नावाने नियुक्ती आदेश, नावातील दुरुस्तीसाठी शिक्षकाचा नऊ वर्षे संघर्ष*

═══════🦋🦋═══════

*📡डिजिटल क्लासरूम हा वर्गाला पर्याय नाही*

 *विद्यार्थ्यांसाठी डिजिटल व्यासपीठ हे परवडेल अशा दरात निर्माण व्हायला हवे...*

*•═════•♍💲🅿•═════•*

*🙆‍♂बनावट स्वाक्षरी केल्याने शाळेवर फौजदारी कारवाई*

~~~~~~~~ *srk*~~~~~~~~

*गटशिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह संस्थाध्यक्ष, सचिवावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.*


By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: June 23, 2019 01:33 PM 

*अकोला :* अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांना शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी प्रस्तावावर गटशिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह संस्थाध्यक्ष, सचिवावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. गटशिक्षणाधिकाºयांनी शनिवारी मूर्तिजापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, हलगर्जी केल्याने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिला आहे.

धार्मिक अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाते. शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील शाळांनी प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचा प्रस्तावही सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त प्रस्तावांची पडताळणी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाºयांमार्फत करण्यात आली. त्यावेळी नॅशनल उर्दू हायस्कूलच्या प्रस्तावावर मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांची स्वाक्षरी बनावट असल्याचे उघड झाले. गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना तसे लेखी स्वरूपातही दिले. त्या अहवालानुसार संबंधित शाळेवर कारवाई करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना १ डिसेंबर २०१८ रोजी देण्यात आला. शिक्षणाधिकाºयांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. दरम्यान, शेख रियाज शेख रऊफ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार जिल्हाधिकाºयांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. २४ जूनपर्यंत ही कारवाई करून तसा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावयाचा आहे. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकाºयांना आदेश दिल्यानंतरही त्यांनी कारवाई न केल्याने त्यांच्यावरही कारवाई करून तसाच अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना बजावले आहे.

*- अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापिकेवर फौजदारी गुन्हे*

याप्रकरणी मूर्तिजापूर पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी स्मिता धावडे यांच्या तक्रारीनुसार पब्लिक एज्युकेशन संस्थेचा अध्यक्ष शेख नासिर शेख हुसेन, सचिव अहमद अली अमजद अली, मुख्याध्यापिका रिजवाना परवीन नासिर शेख या तिघांवर भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४६८,४७१, (३४) या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

*•═════•♍💲🅿•═════•*

*🙆🏻जि.प.शाळांना वयाच्या अटीचा फटका*

~~~~~~~~ *srkoli* ~~~~~~~~

Published On: Jun 24 2019 1:31AM

देवरूख : सागर मुळ्ये

सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यास दाखल करता येऊ शकते, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे वय पूर्ण होत नसलेल्या पाल्यांचे पालक खासगी शाळांमध्ये पाल्याला दाखल करत आहेत. सिनिअर केजीच्या नावाखाली खासगी शाळाही अशा विद्यार्थ्यांना दाखल करून घेत आहेत. त्यामुळे हा नियम सगळ्यांनाच सारखा करावा, अशी मागणी होत आहे.


संगमेश्‍वर तालुक्यातील जि.प.च्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 हजार 411 विद्यार्थी दाखल झाले आहेत. प्रवेशापूर्वी 1 हजार 527 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात 116 विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी शाळा परिसरातील दाखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. याचा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला होता. यामध्ये तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 1 हजार 527 विद्यार्थी प्रवेश करणार होते. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर 116 विद्यार्थी दाखल झाले नाहीत.


तालुक्यातील इंग्रजी व खासगी शाळांमध्ये मात्र 208 विद्यार्थी इयत्ता पहिलीसाठी दाखल  झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी सहा वर्षाचा असावा, असा नियम न्यायालयाने आखून दिला आहे. सर्वेक्षणामधील 116 विद्यार्थ्यांचे वय पूर्ण होत नाही. मात्र 30 सप्टेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे.


न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे प्रत्यक्षात दाखल होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मराठी शाळांनी वयाच्या अटीनुसार नाकारलेल्या मुलांना खासगी शाळा दाखल करून घेत आहेत. खासगी शाळा सिनिअर केजीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेत आहेत. एकदा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झालेला विद्यार्थी परत मराठी शाळांकडे वळत नाही ही वस्तुस्थिती आहे. खासगी शाळेत गेलेला विद्यार्थी इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण घेत राहतो.


परिणामी मराठी शाळांमधील पट कमी होतो. या नियमांमध्ये काही बदल होणे गरजेचे असल्याचे मत काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मराठी शाळेची पटसंख्या जोमाने कमी होत असताना. 6 वर्षे पूर्णची अट पहिलीसाठी दाखल करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आहे. ही अटच मराठी शाळांना बाधित ठरत आहे, अशी ओरड मराठी शाळांमधील शिक्षकांमधूनच केली जात आहे. न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचेही बोल शिक्षकांमधून उमटत आहेत.

*•═════•♍💲🅿•═════•*

*💉वैद्यकीयची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला* 

~~~~~~~~ *srkoli* ~~~~~~~~

Published On: Jun 24 2019 1:51AM

मुंबई : प्रतिनिधी


राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला प्रारंभ झाला असून 26 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) ने जाहीर केले आहे.


देशातील आणि राज्यातील मेडिकल महाविद्यालयांसोबत अभिमत विद्यापीठांमधील मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश नीट परीक्षेच्या गुणांनुसार होतात. नीट परीक्षेचा निकाल 5 जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सीईटी सेलने मेडिकल प्रवेशाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले.  


एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणार्‍या या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अर्जांचे नोंदणी शुल्क 26 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी 26 जूनला सायंकाळी 10 नंतर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 28 जून ते 3 जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. 


एनआरआय विद्यार्थ्यांना 28 जून ते 1 जुलै या कालाधीत मुंबईतील प्रवेश नियंत्रण प्राधिकरण येथे कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राधान्यक्रम 29 जून ते 4 जुलै या कालावधीत भरायचे आहेत. 


प्रवेशाची तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी 4 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेनंतर जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 5 जुलै रोजी रात्री 8 वाजेनंतर जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना 12 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. कॉलेजमध्ये शैक्षणिक सत्राला सुरुवात 1 ऑगस्टपासून होणार आहे, असे सीईटी सेलने कळवले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती वेबसाईटवर मिळेल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

*•═════•♍💲🅿•═════•*

*🤷‍♂अण्णाजीऐवजी अंजली नावाने नियुक्ती आदेश, नावातील दुरुस्तीसाठी शिक्षकाचा नऊ वर्षे संघर्ष*

~~~~~~~~ *srkoli* ~~~~~~~~

*विदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्टाने शिक्षण घेतलेल्या अण्णाजी दयाराम कुळसेंगे यांना ठाणे जिल्हा परिषदेत नऊ वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र...*


By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: June 23, 2019 03:04 AM

- सुरेश लोखंडे

ठाणे : विदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्टाने शिक्षण घेतलेल्या अण्णाजी दयाराम कुळसेंगे यांना ठाणे जिल्हा परिषदेत नऊ वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र, तत्कालीन मिळालेल्या शिक्षक नियुक्ती आदेशावर अण्णाजीऐवजी ‘अंजली’ असे चुकीचे लिहिले गेले. नऊ वर्षांपासून अद्यापपर्यंतही नावातील दुरुस्ती करण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखवले नाही. प्रशासनाच्या या चुकीमुळे शिक्षकास नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बाब सदस्या वृषाली शेवळे यांनी उघडकीस आणली आहे.


गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगेचे रहिवासी आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर, शिक्षक पात्रतेस आवश्यक असलेले ‘डीएड’ ही शिक्षणही पूर्ण केले. परंतु, तेव्हा तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेने दिलेल्या नियुक्त आदेशावर त्यांचे नाव अण्णाजीऐवजी अंजली असे नमूद केले. या चुकीच्या नावावर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही त्यांना हजर करून घेतले. त्यानंतर, नावात दुरुस्तीसाठी ते तब्बल नऊ वर्षांपासून ठाणे जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागात फेऱ्या मारत आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या झरी धांगडपाडा, ता. तलासरी येथे ते कार्यरत आहेत.

अंजलीऐवजी मी ‘अण्णाजी’ असल्याची सर्व कागदपत्रे त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या मूळ गावच्या ग्रामपंचायतीनेही शिफारस केली आहे. मात्र, शालेय कागदपत्रे, डीएड प्रमाणपत्र आदी सर्व कागदपत्रे सुपूर्द करूनही नाव दुरुस्ती करून देण्यास शिक्षणाधिरी टाळाटाळ करीत आहेत.


*जि.प.विरोधात संताप*


गडचिरोलीच्या नक्षली भागातील हा शिक्षक आपल्याकडे स्वाभिमानाने जीवन जगत आहे. चुकी नसतानाही त्याचे नाव ‘अंजली’ असे नियुक्ती आदेशात नमूद केले आहे. त्यातच, प्रशासनही त्याची चोहोबाजूने अडवणूक करत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे व संतापातून या शिक्षकाचे बरेवाईट होऊ शकते. मनस्तापातून ते नक्षलग्रस्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, आदी मुद्यांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही झाली आहे. मात्र, अजूनही कुळसेंगे यांच्या नियुक्ती आदेशातून चुकीची दुरुस्ती करून अण्णाजी असे करून मिळालेले नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मनमानी व अनागोदी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

*•═════•♍💲🅿•═════•*

*📡डिजिटल क्लासरूम हा वर्गाला पर्याय नाही*

~~~~~~~~ *srkoli* ~~~~~~~~

*शिक्षण सर्वव्यापी होणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल व्यासपीठ हे परवडेल अशा दरात निर्माण व्हायला हवे...*


Updated: 24 Jun 2019, 04:00 AM

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिक्षण सर्वव्यापी होणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल व्यासपीठ हे परवडेल अशा दरात निर्माण व्हायला हवे. मात्र, डिजिटल क्‍लासरुम शाळेतल्या वर्गाला पर्याय होऊ शकत नाही,' असे मत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी व्यक्त केले.

'हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशन'तर्फे आयोजित 'पढेगा भारत' अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात शेलार बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार अमर साबळे, 'चाणक्‍य मंडल'चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आमदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. 'शिक्षणमंत्री झाल्यानंतर पहिला सार्वजनिक कार्यक्रम पुण्यात आणि तोही डॉ. माशेलकरांच्या उपस्थितीत होत आहे, याचा आनंद होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा वंचित आणि पीडिताना मुख्य प्रवाहाशी जोडणारा सेतू म्हणून केला जावा,' अशी अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली.

डॉ. माशेलकर म्हणाले, 'देशामध्ये विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची गरज आहे. 'राइट टू एज्युकेशन'बरोबरच 'राइट वे ऑफ एज्युकेशन'सुद्धा हवे आहे. डिजिटल क्‍लासरूम काळाची गरज आहे; मात्र पारंपरिक शिक्षणातील वर्गखोल्याही महत्त्वाच्या आहेत. पारंपरिक शिक्षणात शिक्षकांशी संवाद होणे आवश्‍यक आहे. शिक्षकांना प्रतिष्ठा मिळायला हवी, त्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. डिजिटल शिक्षणासोबतच तळागाळातील प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोचणे ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.'

साबळे म्हणाले, 'शिक्षण व विचाराशिवाय सामाजिक, वैचारिक परिवर्तन होऊ शकणार नाही. त्यासाठी अद्ययावत स्टुडिओ, व्हर्च्युअल ऑथर, डिजिटल क्‍लासरूम अशा टेक्‍नॉलॉजीचे शिक्षण गावातल्या प्रत्येक मुलांपर्यंत पोचले पाहिजे.'

धर्माधिकारी म्हणाले, 'अधिकारी म्हणून काम करताना देशभक्तीही अत्यंत महत्त्वाची आहे. यंत्रणेत काम करणारा अधिकारी देशभक्त असावा. लोक देशाचे मालक व मी सेवक, ही अधिकाऱ्याची भावना असायला हवी.'

*................................................*

पालकांच्या प्रश्नांना शेलारांनी टाळले

अकरावी प्रवेश, खासगी शाळांची मनमानी अशा विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी जमलेल्या पालकांना नवनियुक्त शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हात जोडून कार्यक्रमस्थळावरून निघून जाणे पसंत केले. नव्या शैक्षणिक वर्षात नवे शालेय शिक्षण मंत्री कोणत्या योजना, संकल्पना आणि घोषणा करतात याची उत्सुकता असतानाच शेलार यांनी पत्रकार आणि पालकांच्या प्रश्नांना टाळणे पसंत केले. शालेय धोरणांबाबत पालकांनी शेलार यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केल्यावर शेलार यांनी उत्तरे देण्याचे टाळले. शिक्षणमंत्र्यांनी आमच्या मागण्या सोडविल्याच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या पालकांना शेलार न भेटल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.


*अधिकाऱ्यांची 'शाळा'*


शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी खासगी कार्यक्रमानंतर 'बालभारती'ला भेट देऊन तेथे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या वेळी शेलार यांनी 'पवित्र पोर्टल'बाबत सविस्तर माहिती घेऊन, त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना दिल्या. पात्रताधारकांना 'पवित्र पोर्टल'वर लॉगइन करण्यासोबतच तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत शेलार यांना पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभाग आणि एजन्सीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, 'बालभारती'चे संचालक डॉ. सुनील मगर, महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे, डॉ. दिनकर पाटील आदी उपस्थित होते. 'पवित्र पोर्टल'चा सर्व्हर बदलण्यात आला. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतरही फारसा फरक पडलेला नाही. प्रक्रिया रखडत असल्याने पात्रताधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता शालेय शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनंतर तरी शिक्षकभरती सुरळीतपणे होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

═══════🦋🦋═══════

   🅢🅐🅣🅘🅢🅗 🅚🅞🅛🅘

      🅚🅗🅤🅛🅣🅐🅑🅐🅓

▂▃▅▓▒░▒░░░▒▓▅▃▂

    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Post a Comment

0 Comments