आदिम विकास परिषदसोबत TRTI मध्ये महत्त्वपुर्ण चर्चा..दि.२०/६/२०१९ पुणे


आदिम विकासपरिषद सोबत TRTI मध्ये कार्यशाळा.

 अनेक विषयावर महत्वपुर्ण चर्चा,   कायमस्वरुपी प्रश्न सोडविण्यासाठी  वेगाने काम करण्याच्या आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी साहेबांच्या अधिका-यांना सुचना.


 आदिम विकासपरिषदचे अध्यक्ष तथा भा.ज.प. प्रदेशसदस्य मा.अविनाशजी कोळी साहेबांच्या पुढाकाराने दि.20/6/2019 रोजी TRTI पुणे चे आयुक्त मा.डॉ.किरण कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख  उपस्थितीत आदिम विकास परिषदेचे अभ्यासक -संशोधक व निवडक 20 समाजबांधव  पदाधिकारी यांची व  औरंगाबाद ,ठाणे पुणे येथील जमात प्रमाणपञ पडताळणी समितीचे उपाध्यक्ष ,सहआयुक्त , संचालक ,  संशोधन अधिकारी (वरीष्ठ) विधी व सेवा यांची एकञित कार्यशाळा  घेण्यात आली.


 बैठकीच्या प्रारंभीआदिमचे उपस्थित मान्यवर व TRTI&पडताळणी समितीचे   अधिकारी यांचा अल्पपरिचय व स्वागतानंतर कार्यशाळेस प्रारंभ झाला.

 बैठकीचे  प्रास्ताविकात आदिमचे मराठवाडा अध्यक्ष रमेश  पिठ्ठलवाड यांनी गेल्या जून 2018 पासूनआदिम विकासपरिषदेने  प्रशासनाकडे केलेल्या मिटींचा आढावा मांडतांना 

1) दि.13जून 2018ची आयुक्तांच्या  दालनात आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी साहेब TRTI यांच्यासोबतची  स्वतंञ छोटेखानी बैठक .


2) 20जुलै 2018 रोजी महसुल आयुक्त तथा SIT अध्यक्ष मा.भापकर साहेब यांच्यासमोर आदिमच्या वतीने  मराठवाड्याच्या बाबतीतील पुरावे देऊन SIT ने जनसुनावणी घेवून आदिम सह ईतर संघटनांना म्हणणे मांडण्यासाठी केलेली लेखी स्वरुपात केलेली विनंती.

  त्याची परिनिती म्हणून

SITने लावलेल्या दोन जनसुणावण्या.


3)24जुलै 2018 रोजी किनवट येथील SITच्या जनसुणावतीत आदिम विकास परिषदेएका टीमने तत्कालीन SIT सचिव डॉ,कुलकर्णी साहेबासमोर 1100 पानांचे दस्ताऐवज सादर सविस्तर मांडलेले म्हणणे.

4) 25 जूलै 2018 ला विभागीय आयुक्तलयात S I T अध्यक्ष मा.भापकर साहेबांच्या व अन्य सदस्यांच्या समोर आदिमच्या दुस-या टीमने मराठवाड्यातील कोळी हे महादेवकोळी किंवा मल्हारकोळीच  आहेत याबाबतीत दस्ताऐवजांसह  आपली दमदारपणे बाजू मांडून S I Tच्या  अहवालात ह्या दस्ताऐवजांचा समावेश करण्याची आग्रही मागणी केली.

5)22आॕगस्ट2018 रोजी विधानभवनातील विधानसभा अध्यक्ष मा.हरीभाऊ बागडे (नाना) यांच्या दालनात बैठक घेवून  ऐतिहासिक दस्ताऐवज सादर मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार  प्रश्नांसाठी पुढाकार घेण्यासाठीआग्रही विनंती केली.

 त्याची फलश्रुती  म्हणजे  

6)  25आॕगस्ट 2018 रोजी विभागीय आयुक्तालयात दोन्ही  आयुक्त मा. भापकर साहेब व डॉ. किरण कुलकर्णी साहेब व पडताळणी समितीचे अधिकारी यांची झालेली बैठक आणि बैठकीत मा. बागडे साहेबांनी दस्ताऐवजांआधारे मांडलेली बाजू. व कशाच्या आधारावर बोगस ?उपस्थित केलेला सवाल.

7)16आॕक्टो.2018 ला आदिवासी मंञी मा.विष्णूजी सवरा यांच्या अध्यक्षतेखालील व आदिवासी विभागाचे प्रधान सचिव,आयुक्त ,उपसचिव, राज्यातील पडताळणी समितीचे सहआयुक्त वईतर अधिका-यांसह झालेली बैठक व बैठकीत दस्ताऐवजांआधारे मुद्देसुद पडे मांडलेली बाजू. व कार्यशाळा घेण्याबाबत एकमताने झालेला ठराव.

   या बैठकीची फलश्रुती म्हणजेअवघ्या 15 व्या  दिवशी

8) 30आँक्टो.2018 रोजी आदिवासी विभागाचा जत पडताळणी प्रक्रीयेत समाविष्ट अधिका-यांच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चित करतांना जमातीच्या प्राचीन दुर्मिळ ग्रंथ, दस्ताऐवज व पुस्तकांचा आधार घेवून जातपडताळणी प्रक्रीयेत  सुलभता आणण्याबाबतीत  काढलेला शासननिर्णय.

 आणि या शासन निर्णयानंतर सात महिन्याच्या कालावधीत पडताळणी समितीतील संशोधन अधिका-यांनी केलेले संशोधन आदिमला अवगत करण्याची विनंती केली.

 यावर  मान्यवरांनी सर्व ग्रंथ ग्रंथालयात सुञबध्द लावून प्राचीन दस्ताऐवजांचा अभ्यास सुरु असल्याचे सांगितले .

 यानंतर  मा.बालकिशन बंडेवाड यांनी  विषयांची   सविस्तर  आणि विस्तृतपणे मांडणी करतांना मा.सुप्रिम कोर्टाच्या वेगवेगळ्या संविधानिक पिठाने दिलेले निर्णय यामध्ये  इंद्रा साहनी विरुध्द संघशासन ; राज्यशासन विरुध्द मिलिंद; माधूरी पाटील ; 1976चे अमेंडमेंट; 1950 पुर्वीचे  पुरावे या सर्व बाबींची  सांगड घालत TRTI  व पडताळणी समित्या कसे चुकीची कामे करीत आहेत हे दाखवून दिले.  तसेच 1950 पुर्वीच्या पुराव्यावर दस्ताऐवजांवर आधारीत Online library  सुरु करावी जेणेकरुन पडताळणी समित्या व संबंधित जमातीच्या  लोकांना त्या पुराव्याच्या आधारे प्रकरणे निकाली काढणे सोपे होईल.व यामुळे कामकाजात पारदर्शकता  वाढेल. यामुळे विशेषतः सध्या ज्वलंत असलेल्या  मेडीकल , इंजिनियरींगच्या व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशित विद्यार्थांच्या प्रकरणात त्याचा वापर करुन घेता येईल. अशी आग्रही बाजू मांडली. त्यांनी संशोधन करुनच प्रकरणे हाताळली जावीत यावर भर दिला.

 तसेच सोशल स्टेटस् वर भर देत संविधानाने घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे काम करण्यावर भर देण्याची विनंती केली. स्वर्गीय. स्वाती पिटले , स्वर्गीय  राजू विभूते या प्रकरणांचा उल्लेख करत मराठवाड्यातील कोळी महादेव , कोळी मल्हार या जमातीच्या  लोकांना संविधानिक हक्क न मिळाल्याने आत्महत्या  करण्याची वेळ आली म्हणून मराठवाड्यातील जमातीच्या संदर्भाने लवकरात लवकर ठोस पावले उचलली जावीत अशी जोरदार मागणी केली. 

यावेळी औरंगाबाद हायकोर्टाचे वकिल अॕड.ओमगशद बोईनवाड यांनी विषयाची मांडणी करतांना 

जून्या नोंदी कोळी असल्या तरी ह्या नोंदी ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर कोळी महादेव किंवा कोळी मल्हार ग्राह्य धराव्यात व प्रकरण वैद्य ठरवावे.   तसेच समितीने प्रकरण तपासतांना ऐतिहासिक  दस्ताऐवज ,गॕझेटिअर्स चा वापर करावा.   ज्यामुळे लोकांचे प्रकरण वैद्य होण्यास मदत होईल.   याबरोबरच जातपडताळणीचा विषय  मागुल 35  वर्षापासून जटील क्लिष्ट विषय आहे , याचा  गुंता चर्चा करुन तातडीने सोडवावा.  तसेच 24एप्रिल 1985 चा जी.आर. कालबाह्य आहे तसेच डॉ. गारेंचे संशोधन तथ्यहीन असल्याने त्याचा वापर  पडताळणी समितीने करु नये. 

यावेळी तरुण अभ्यासक व माहीती अधिकाराचे मसिहा लक्षमण  सिंगोरे यांनी  विस्तृतपणे विषय मांडताना दि.20/8/1982च्या जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीनुसार दि.24 एप्रिल 1985च्या  जी.आर. कशा पद्धतीने तयार झाला याची प्रोसिंडिंग वाचवून दाखवून Start To End  केवळ  सहा तासात कसा तयार झाला हे सांगताना प्रोसिडींग दाखवली. तसेच 24एप्रिल 1985च्या  जी आर. साठी जो अहवाल आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI ) यांनी तयार केला होता याची बारकाईने अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासगट दि.10नोव्हे.1983ला  तयार  झाला  आणि सदरील अभ्यासगटाने दुपारी 12 वा .अभ्यास सुरु केला आणि 28 जमातीचा त्याचदिवशी अतिघाईघाईने  त्या अहवालास मंजूरी दिलेली आहे. ही अतिशय गंभीर बाब आणि कटकारस्थानाचाच काहीजमातीचा संपवण्याचा  भाग आहे हे पुराव्यासह मांडले.

 तसेच जी.आर.मध्ये नमूद माहीती ही 1950 पुर्वीच्या ऐतिहासिक दस्ताऐवजच्या विरोद्धात आहे  हे स्पष्टपणे मांडले. तसेच OTST ची लोकसंख्या TSP पेक्षा 13 लाखांनी जास्त असून सुद्धा एकही प्रतिनिधी  TAC मध्ये नाही त्या सतत अन्याय होत आहे. TAC Counsil rules 13 प्रमाणे TAC बैठकीला मुख्यमंञी  अधिकार असूनही OTOP मधील प्रतिनिधीला बोलावत नाहीत हा विस्तारीत क्षेत्रावर मोठा अन्याय आहे.त्यामूळे   TAC मध्ये धोरणात्मक बदल करण्याची गरज असल्याचे आग्रहीपणे मांडले.

 यावेळी अभियंता चंद्रकांत बुधवारे यांनीही विषय मांडतांना जनगणना 1921 च्या आधारे हैद्राबाद स्टेटमध्ये फक्त कोळी महादेव कोळी मल्हारच होते . तसेच अनुसुचित क्षेञातील लोकांच्या नोंदी केवळ कोळी असल्या तरी त्यांना कोळी महादेव प्रमाणपञ देता तर मराठवाड्याच्या नोंदी तशाच असतील प्रकरणे अवैध का ठरवता? असा सवाल केला. तसेच 30/10/18च्या आदिवासी विभागाच्या शासन निर्णयाआधारे जमातीचे प्राचीन दुर्मिळ ग्रंथ, जनगणना , गॕझेटिअर्स विचारात घेऊन मराठवाड्यातील लोकांना वैधता प्रमाणपञ देण्यात यावे. तसेच हैद्राबाद स्टेटमध्ये1921 ला कोळी महादेव वकोळी मल्हार असलेले हे 1950 नंतर केवळ कोळी कसे झाले ?तसेच आजोबा पजजोबा यांच्या नोंदी कोळी  आसतील तर त्या ग्राह्य धराव्यात.अशी विनंती केली

 यावेळी गिरीश बिजलवाड यांनी महावरकर यांच्या सहीने दररोज तीनप्रकरणे अवैध झाली पाहीजेत असे काढलेले  पञक दाखवून असे पञक कसे काय काढू शकतात.?आणि सध्याच्या अधिका-यांचीही मानसिकता तशीच आहे की काय ? काळात . आशी विचारणा केली.

 तसेच रेखडगेवाड सर यांनीही शासनाच्या आदेशाचा आधार देत मुख्य जातीची नोंद घेण्याबाबतीत पञ होते तेव्हा अपूर्ण नोंदीअसतील तर त्यात जमातीचा दोष कसा ? यावर विस्तृतपणे विचार मांडले. तसेच आनंदा रेजितवाड यांनीही पडताळणी समिती काही जमातीचीच प्रकरणे मुद्दाम  प्रलंबित ठेवून दुजाभाव का करते हे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

 यावेळी वेळोवेळी उपस्थित झालेल्या  मुद्यांच्या अनुषंगाने  वारंवारं सुचना देऊन मुद्दे लिहून घैण्यास सांगतांना उपाययोजना करतांना चर्चेतून निघालेले मार्ग सुचविले. प्रत्येक मुद्दा गांभीर्याने घेत त्यावर उपाययोजनात्मक पर्याय सुचविले. आणि संशोधन वेगाने होण्यासाठी आदिमचे तीन चार संशोधक व  TRTI चे संशोधन अधिकारी मा.गायकवाड साहेब यांनी  दर पंधरा दिवसांनी एकञित बसून संशोधन निकोप करण्याबाबतीत सुचना दिल्या.

 यावेळी कार्यशाळेचा समारोप करतांना आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष मा.अविनाशजी कोळी साहेबांनी उपस्थित सर्व मुद्दांचे व आयुक्त  डॉ. किरण कुलकर्णी साहेबांनी यावरील सुचविलेले उपाय यावर मुद्देनिहाय विस्तृत विवेचण केले आणि मा.आयुक्त यांच्या सोबत यापुढेही अशाच बैठक घेऊन निवडणूकीपूर्वी समाजाला दिलासा देण्याबाबत पुढाकार घेतील आणि आपण मुख्यमंञी महोदयाकडे हा  विषय लावून धरु आणि त्यात आयुक्त साहेबांची महत्वाची भुमिका असेल अशी अपेक्षा व्याक्त केली.सर्वांनी अशीच साथ देण्याची साद घातली . 

 या कार्यशाळेस TRTI आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी साहेब,सहआयुक्त मा.पावरा साहेब (औरंगाबादसमिती) सहआयुक्त मा.भालेकर साहेब, मानववंशशास्ञज्ञ मा.जाॕन गायकवाड , व मा.चिद्विलास मोरे , सहसंचालक श्रीमती आवडे मॕडम, वरिष्ठ संशोधन अधिकारी श्रीमती   एस.एम.केदार मॕडम , स्टेनो किरण कुरुडे  मा सारोळकर हे उपस्थित होते .तर या कार्यशाळेस आदिमचे प्रमुख पदाधिकारीसह  वैजनाथराव मेघमाळे ,गणेशराव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर मरकंटे,, दादाराव कोठेवाड ,के.एन.जेठेवाड, अनिल सिरसाठ, साहेबराव दांडगे , गोपाळ जिनेवाड, राजेश मंदेवाड ,नगरसेवक बोईनवाड साहेब,बा-हाळे सर,कल्याण मोरे असे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments

  1. चर्चा योग्य आहे पण अंतिम निर्णय TRTI ही स्वायत्त संस्था असलेमुळे स्वत: घ्यावा जून्या कोळू नोंदी जनरिक टर्म मुळे आल्या आहेत.त्यामुळे त्या कोळी महादेव,कोळी मल्हार व टोकरे कोळी दावे वैध करण्यास अडथळा ठरणीर नाहीत असे जाहीर करावे. व ट्राईबलच्या तपासणी समित्यांना फक्त कोळी नोंदी वर दावे अवैध करण्याचे काम थांबवावे व वैधता देण्याचे आदेश द्यावेत.

    ReplyDelete