*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀#Chandrayaan2 पुढील रणनीती काय असेल? इस्रो प्रमुख के.सिवन म्हणाले...*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀अन् क्षणात लँडरचा संपर्क तुटला...*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀‘इस्रो’ प्रमुखांच्या भावना अनावर, मोदींना मारली मिठी*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀चांद्रयान २: परदेशी माध्यमातून कौतुकोवर्षाव*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀सर्व काही संपलेलं नाही! न्यूयॉर्क टाइम्सकडून इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀रशियाची साथ न मिळाल्यामुळेच भारताने चांद्रयान-२ साठी बनवला लँडर, रोव्हर*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ISRO-lost-contact-with-the-Chandrayaan-2-lander-Vikram-chief-K-Sivan-says-trying-to-contact-lander/m/
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀#Chandrayaan2 पुढील रणनीती काय असेल? इस्रो प्रमुख के.सिवन म्हणाले...*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
Published On: Sep 07 2019 7:39PM | Last Updated: Sep 07 2019 7:39PM
इस्रो प्रमुख के.सिवन
बेंगळुरू : पुढारी ऑनलाईन
भारताच्या अंतराळ मोहिमेतील मैलाचा दगड असलेल्या चांद्रयान २ मोहिमेला अखेरच्या क्षणी झटका लागला. त्यामुळे अनेक दिवस उत्कंठा लागून राहिलेल्या समस्त भारतीयांसह अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) प्रत्येक वैज्ञानिकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. नेहमीच चैतन्याने सळसळणाऱ्या इस्रोमध्ये काही काळासाठी सन्नाटा पसरला गेला.
आपल्या वैज्ञानिकांनी आशेचा किरण अजूनही सोडलेला नाही. इस्रो प्रमुख के. सिवन यांना मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात यशाने हुलकावणी दिल्याने गहिवरून आले. त्यांनी या घटनेनंतर सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या डीडी न्यूज विशेष मुलाखतीमध्ये पुढील टप्पा कोणता असेल याची माहिती दिली.
सिवन म्हणाले, की विक्रम लँडर पुन्हा संपर्क करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आकड्यांचे विश्लेषण केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. चांद्रयान मोहिम ९५ टक्के यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी चांद्रयान २ ऑर्बिटर आगामी साडे सात वर्ष काम करु शकतो अशी माहिती दिली. इस्रोच्या गगनयानसह भविष्यातील सर्व मोहिम्या नियोजित वेळेमध्येच पूर्ण केल्या जातील असेही सिवन यांनी नमूद केले.
चांद्रयान २ मोहिमेतील लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी असतानाच इस्रोच्या बेंगळुरू मुख्यालयातून संपर्क तुटला गेला. दरम्यान, विक्रम लँडरचा संपर्क तुटला असला, तरी ऑर्बिटरचा संपर्क कायम आहे. जरी विक्रम लँडर इस्रोच्या संपर्कातून बाहेर गेला असला, तरी विश्वास आणखी द्विगुणित झाला आहे.
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀अन् क्षणात लँडरचा संपर्क तुटला...*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
Published On: Sep 07 2019 3:26AM | Last Updated: Sep 07 2019 3:34AM
बंगळूर : वृत्तसंस्था
शनिवारी पहाटेचे 1.30 वाजल्याबरोबर इस्रोच नव्हे, तर जगभरातील शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींबरोबरच भारतीयांच्या ह्रदयाचे ठोकेही वाढत होते, उत्कंठा शिगेला पोहोचली होती...आता चंद्राचा पृष्ठभाग केवळ 2.1 किलोमीटर राहिला असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. सिग्नल दिसणे बंद झाले. त्यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत इस्रोकडून मोहिमेविषयी कोणतीही घोषणा झाली नाही.
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेविषयी जगभरात कुतूहल होते. शुक्रवारी मध्यरात्री 1.53 वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-2 मोहिमेंतर्गत पाठवलेल्या विक्रम नावाचे लँडर चांद्रभूमीवर उतरणार असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चंद्राच्या पृष्ठभागापासून 35 किलोमीटरवर असलेल्या विक्रम लँडरने पहाटे 1.30 वाजता चंद्राच्या दिशेने वाटचाल केली. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, केवळ 2.1 किलोमीटरचे अंतर बाकी असताना लँडरचा संपर्क तुटला. रात्री उशिरापर्यंत लँडरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मोहिमेच्या यशस्वी किंवा अयशस्वीतेविषयी उत्कंठा कायम राहिली.
विक्रम लँडरच्या चंद्रस्पर्शाचा अभूतपूर्व क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी कोट्यवधी नागरिकांनी दूरदर्शनसह सोशल मीडियाचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: इस्रोच्या बंगळूर केंद्रात उपस्थित होते. त्यांच्यासोबत शाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांनीही हा अभूतपूर्व सोहळा अनुभवला. लँडरचा संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण पसरले होते. पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रज्ञांनी संवाद साधत देश तुमच्यासोबत असल्याचे सांगून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय मोदींनी काही काळ विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
*तुम्ही धीर सोडू नका मी तुमच्या सोबत*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांना दिला धीर. देशाला तुमचा अभिमान आहे. आयुष्यात चढउतार येतच असतात. यातून बरेच काही शिकायला मिळते, तुम्ही धीर सोडू नका मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही देशाची खुप सेवा केली आहे. माझ्याकडून तुम्हाला खुप सार्या शुभेच्छा.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी
*विक्रम लँडरशी संपर्काची वाट पाहतोय*
चंद्रापासून 2.1 किलोमीटरवर असेपर्यंत नियोजित मार्गाने विक्रम काम करत होते. मात्र त्यानंतर संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्काची आम्हीही वाट पाहतोय. सध्या डेटाची तपासणी केली जात आहे. लवकरच माहिती देऊ.
*- इस्रो प्रमुख के. सिवन*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻
https://uc.xyz/4Porl?pub=link
*Video पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.*
*🚀‘इस्रो’ प्रमुखांच्या भावना अनावर, मोदींना मारली मिठी*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो.
लोकसत्ता ऑनलाइन | September 7, 2019 10:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधून संपूर्ण भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवणारं भाषणं केलं. मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. निराश होऊ नका. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोगच, असे मोदी म्हणाले. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले.
भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधील उपस्थित प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हात मिळवला. म्हणाले, ‘ तुमच्या सारखे ज्येष्ठ लोक इथे असल्याने याचा मोठा फायदा होतो.’ यावेळी इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दे आपलं दुखं लपवू शकले नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केलं.
*विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग – मोदी*
चांद्रयान २ च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता असे मोदी म्हणाले. इस्त्रोच्या सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.
यावेळी मोदी म्हणाले की, ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचे इस्रोनं जतन केलं आहे. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*🚀चांद्रयान २: परदेशी माध्यमातून कौतुकोवर्षाव*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 07 Sep 2019, 07:18 PM
*इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेवर फक्त भारतीयांचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी जगभरातील प्रमुख माध्यमांनी भारताच्या या अंतराळ मिशनची दखल घेतली आहे.*
नवी दिल्ली: इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेवर फक्त भारतीयांचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी जगभरातील प्रमुख माध्यमांनी भारताच्या या अंतराळ मिशनची दखल घेतली आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान-२'ची मोहीम होती. याआधी कोणत्याच दे्शाची चांद्रमोहीम या ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळेचन संपूर्ण जगाचे लक्ष या अंतराळ मोहिमेवर लागले होते. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी आणि गार्डियन यांच्यांसह अनेक प्रसारमाध्यमांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेची दखल घेतली.
*चांद्रयान-२ हे भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे अमेरिकन मॅगझिन वायरने म्हटले. विक्रम लॅडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवण्यास अपयश आल्यामुळे भारताला धक्का बसला आहे. मात्र, हे अपयश म्हणजे पराभव आहे, असे समजू नये असेही यात म्हटले आहे.* भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि अनेक दशकांपासून विकसित होत असलेला अंतराळ कार्यक्रम यातून भारताची जागतिक स्तरावरील अंतराळ क्षेत्रातील महत्त्वकांक्षा अधिक प्रबळ असल्याचे दिसून येत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. *चांद्रयान-२चे एक ऑरबीटर अजूनही चंद्राभोवती आहे. त्यामुळे ही मोहीम अंशत: अपयशी झाली असे म्हणावे लागत असून चंद्रावर उतरणाऱ्या देशांच्या यादीत येण्यासाठी भारताला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले.*
ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने आपल्या लेखात इस्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. *भारताच्या चांद्रयान २ ला अपयश आले असले तरी भारतीय नागरिकांना याचे विशेष कौतुक वाटत असून राष्ट्राभिमानाची भावना उंचावली असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.* सोशल मीडियावर भारतीय संशोधकांना मोठा पाठिंबा मिळाला असून अपयशातून संशोधक भरारी घेतील. या मोहिमेमुळे तरुणांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले. चांद्रयान-२ वर करण्यात आलेला खर्च हा अमेरिकेच्या अपोलो मिशनच्या खर्चाचा छोटा हिस्सा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
बीबीसीने चांद्रयान २ मोहिमेवर झालेल्या खर्चावर टिप्पणी केली आहे. हॉलिवूड चित्रपट अॅव्हेंजर्स: एन्डगेम या चित्रपटाची निर्मिती चांद्रयान-२ मोहिमेपेक्षा अधिक खर्चिक असल्याचे नमूद केले आहे. मंगळायानवर कमी खर्च करण्यात आला होता याकडेही बीबीसीने लक्ष वेधले. *सीएनएमनेदे्खील चांद्रयान-२च्या उत्सुकतेबाबत नमूद केले आहे. भारतात रोव्हर चंद्रावर उतरताना येणाऱ्या छोट्या छोट्या यशाचा आनंद साजरा करण्यात येत होता. मात्र, 'विक्रम'शी संपर्क तुटल्यानंतर शांतता पसरली. भारताच्या ऐतिहासिक प्रयत्नाची सांगता अपयशाने झाली असल्याचे सीएनएनने म्हटले.*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*🚀सर्व काही संपलेलं नाही! न्यूयॉर्क टाइम्सकडून इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*चंद्राच्या ज्या भागात इस्रोने जायचे धाडस दाखवले त्याबद्दल भारतातूनच नव्हे तर जगभरातून इस्रोचे कौतुक होत आहे.*
लोकसत्ता ऑनलाइन | September 7, 2019 01:45 pm
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची जगभरातील माध्यमांनी प्रामुख्याने दखल घेतली आहे. चंद्राच्या ज्या भागात इस्रोने जायचे धाडस दाखवले त्याबद्दल भारतातूनच नव्हे तर जगभरातून इस्रोचे कौतुक होत आहे. विक्रम लँडरचे लँडिंग यशस्वी ठरले असते तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला असता.
चांद्रयान-२ चा लँडर मार्गावरुन भरकटलेला असला तरी मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही असे अमेरिकन मॅगझिन वायर्डच्या ऑनलाइन एडिशनने म्हटले आहे. चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लँडर आणि त्यातील विक्रम रोव्हरचा तुटलेला संपर्क हा भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी एक झटका आहे. पण मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही असे वायर्डने म्हटले आहे.
जागतिक उदिद्ष्टय डोळयासमोर ठेऊन अनेक दशकापासून सुरु असलेल्या भारताच्या अवकाश विकास कार्यक्रमाचे आणि इंजिनिअरींग कौशल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केले आहे. चांद्रयान-२ चा लँडर चंद्रावर उतरु शकला नसला तरी ते अंशत: अपयश आहे. ऑर्बिटर कार्यरत राहणार आहे. फक्त चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांच्या पंक्तीत पोहोचायला भारताला थोडा वेळ लागेल असे न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले आहे.
चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरु असताना भारताचा लँडर बरोबर संपर्क तुटला. भारताच्या वाढत्या अवकाश महत्वकांक्षेला हा धक्का आहे. आतापर्यंत ३८ वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे प्रयत्न झाले त्यातील फक्त निम्म्यावेळा यश मिळालं. चांद्रयान-२ मुळे चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल अशी भारताला अपेक्षा होती. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानंतर त्यावेळी सर्वच माध्यमांनी या बातमीला ठळक प्रसिद्धी दिली. २२ जुलैला चांद्रयान-२ अवकाशात झेपावले तेव्हापासून सर्व काही सुरळीत सुरु होते. पण चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना लँडर आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*🚀रशियाची साथ न मिळाल्यामुळेच भारताने चांद्रयान-२ साठी बनवला लँडर, रोव्हर*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*चांद्रयान-२ चे प्रक्षेपण नियोजित वेळापत्रकानुसार २०११ साली अपेक्षित होते. २००८ साली चांद्रयान-१ च्या यशानंतर या मोहिमेची आखणी करण्यात आली होती.*
लोकसत्ता ऑनलाइन | September 7, 2019 04:22 pm
रशियाची साथ न मिळाल्यामुळेच भारताने चांद्रयान-२ साठी बनवला लँडर, रोव्हर
चांद्रयान-२ चे प्रक्षेपण नियोजित वेळापत्रकानुसार २०११ साली अपेक्षित होते. २००८ साली चांद्रयान-१ च्या यशानंतर या मोहिमेची आखणी करण्यात आली होती. त्यावेळी चांद्रयान-२ ही भारत आणि रशियाची संयुक्त मोहिम होती. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चांद्रयान-२ मोहिमेसाठी रॉकेट आणि ऑर्बिटर मॉडुयल उपलब्ध करणार होते तर रशियाची रॉसकॉसमॉस अवकाश संस्था लँडर आणि रोव्हर देणार होती.
त्यावेळी इस्रोकडे स्वत:चा लँडर आणि रोव्हर बनवण्याची क्षमता नव्हती. रशिया ज्या पद्धतीचे लँडर आणि रोव्हर चांद्रयान-२ मोहिमेसाठी पाठवणार होते. त्याने वेगवेगळया मोहिमांमध्ये अडचणी निर्माण केल्या होत्या. रॉसकॉसमॉसला डिझाईनमध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागल्या. नवीन प्रस्तावित डिझाइन सुद्धा चांद्रयान-२ साठी अयोग्य होती. अखेर रशियाने या सहकार्य करारातून माघार घेतली. त्यामुळे इस्रोसमोर स्वत:चा लँडर आणि रोव्हर बनवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अखेर भारतीय वैज्ञानिकांनी अथक मेहनतीने स्वदेशी बनावटीचा लँडर आणि रोव्हर विकसित केला. त्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेला इतका विलंब झाला.
चांद्रयान-२ चे तंत्रज्ञान विकसित करत असताना इस्रोला मुख्य यानाच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला. २०११ साली आपण ज्या यानाचे प्रक्षेपण करणार होतो त्यापेक्षा अधिक चांगले डिझाइन, यान आपल्या शास्त्रज्ञांनी विकसित केले.
⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सतीश कोळी*
*भद्रा मारुती खुलताबाद*
*📲 9158983616📱*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments