*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*༺꧁ Ⓜ💲🅿꧂༻*
*_सतीश कोळी , खुलताबाद_*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀‘इस्रो’ प्रमुखांच्या भावना अनावर, मोदींना मारली मिठी*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀रशियाची साथ न मिळाल्यामुळेच भारताने चांद्रयान-२ साठी बनवला लँडर, रोव्हर*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀अपयशाचा सामना कसा करायचा? अब्दुल कलाम यांचे ‘ते’ शब्द*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀‘चांद्रयान-२’बद्दल अब्दुल कलाम यांनी १० वर्षांपूर्वीच दिला होता सल्ला, म्हणाले होते…*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀चांद्रयान २: परदेशी माध्यमातून कौतुकोवर्षाव*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
https://uc.xyz/4Porl?pub=link
*Video पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.*
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
*🚀‘इस्रो’ प्रमुखांच्या भावना अनावर, मोदींना मारली मिठी*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो.
लोकसत्ता ऑनलाइन | September 7, 2019 10:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधून संपूर्ण भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवणारं भाषणं केलं. मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. निराश होऊ नका. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोगच, असे मोदी म्हणाले. या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले.
भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोमधील उपस्थित प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हात मिळवला. म्हणाले, ‘ तुमच्या सारखे ज्येष्ठ लोक इथे असल्याने याचा मोठा फायदा होतो.’ यावेळी इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दे आपलं दुखं लपवू शकले नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केलं.
*विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग – मोदी*
चांद्रयान २ च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता असे मोदी म्हणाले. इस्त्रोच्या सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.
यावेळी मोदी म्हणाले की, ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचे इस्रोनं जतन केलं आहे. मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻
*🚀चांद्रयान २: परदेशी माध्यमातून कौतुकोवर्षाव*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 07 Sep 2019, 07:18 PM
*इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेवर फक्त भारतीयांचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी जगभरातील प्रमुख माध्यमांनी भारताच्या या अंतराळ मिशनची दखल घेतली आहे.*
नवी दिल्ली: इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेवर फक्त भारतीयांचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी जगभरातील प्रमुख माध्यमांनी भारताच्या या अंतराळ मिशनची दखल घेतली आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान-२'ची मोहीम होती. याआधी कोणत्याच दे्शाची चांद्रमोहीम या ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळेचन संपूर्ण जगाचे लक्ष या अंतराळ मोहिमेवर लागले होते. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी आणि गार्डियन यांच्यांसह अनेक प्रसारमाध्यमांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेची दखल घेतली.
*चांद्रयान-२ हे भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे अमेरिकन मॅगझिन वायरने म्हटले. विक्रम लॅडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवण्यास अपयश आल्यामुळे भारताला धक्का बसला आहे. मात्र, हे अपयश म्हणजे पराभव आहे, असे समजू नये असेही यात म्हटले आहे.* भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि अनेक दशकांपासून विकसित होत असलेला अंतराळ कार्यक्रम यातून भारताची जागतिक स्तरावरील अंतराळ क्षेत्रातील महत्त्वकांक्षा अधिक प्रबळ असल्याचे दिसून येत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. *चांद्रयान-२चे एक ऑरबीटर अजूनही चंद्राभोवती आहे. त्यामुळे ही मोहीम अंशत: अपयशी झाली असे म्हणावे लागत असून चंद्रावर उतरणाऱ्या देशांच्या यादीत येण्यासाठी भारताला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले.*
ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने आपल्या लेखात इस्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. *भारताच्या चांद्रयान २ ला अपयश आले असले तरी भारतीय नागरिकांना याचे विशेष कौतुक वाटत असून राष्ट्राभिमानाची भावना उंचावली असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.* सोशल मीडियावर भारतीय संशोधकांना मोठा पाठिंबा मिळाला असून अपयशातून संशोधक भरारी घेतील. या मोहिमेमुळे तरुणांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले. चांद्रयान-२ वर करण्यात आलेला खर्च हा अमेरिकेच्या अपोलो मिशनच्या खर्चाचा छोटा हिस्सा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
बीबीसीने चांद्रयान २ मोहिमेवर झालेल्या खर्चावर टिप्पणी केली आहे. हॉलिवूड चित्रपट अॅव्हेंजर्स: एन्डगेम या चित्रपटाची निर्मिती चांद्रयान-२ मोहिमेपेक्षा अधिक खर्चिक असल्याचे नमूद केले आहे. मंगळायानवर कमी खर्च करण्यात आला होता याकडेही बीबीसीने लक्ष वेधले. *सीएनएमनेदे्खील चांद्रयान-२च्या उत्सुकतेबाबत नमूद केले आहे. भारतात रोव्हर चंद्रावर उतरताना येणाऱ्या छोट्या छोट्या यशाचा आनंद साजरा करण्यात येत होता. मात्र, 'विक्रम'शी संपर्क तुटल्यानंतर शांतता पसरली. भारताच्या ऐतिहासिक प्रयत्नाची सांगता अपयशाने झाली असल्याचे सीएनएनने म्हटले.*
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*🚀रशियाची साथ न मिळाल्यामुळेच भारताने चांद्रयान-२ साठी बनवला लँडर, रोव्हर*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*चांद्रयान-२ चे प्रक्षेपण नियोजित वेळापत्रकानुसार २०११ साली अपेक्षित होते. २००८ साली चांद्रयान-१ च्या यशानंतर या मोहिमेची आखणी करण्यात आली होती.*
लोकसत्ता ऑनलाइन | September 7, 2019 04:22 pm
रशियाची साथ न मिळाल्यामुळेच भारताने चांद्रयान-२ साठी बनवला लँडर, रोव्हर
चांद्रयान-२ चे प्रक्षेपण नियोजित वेळापत्रकानुसार २०११ साली अपेक्षित होते. २००८ साली चांद्रयान-१ च्या यशानंतर या मोहिमेची आखणी करण्यात आली होती. त्यावेळी चांद्रयान-२ ही भारत आणि रशियाची संयुक्त मोहिम होती. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चांद्रयान-२ मोहिमेसाठी रॉकेट आणि ऑर्बिटर मॉडुयल उपलब्ध करणार होते तर रशियाची रॉसकॉसमॉस अवकाश संस्था लँडर आणि रोव्हर देणार होती.
त्यावेळी इस्रोकडे स्वत:चा लँडर आणि रोव्हर बनवण्याची क्षमता नव्हती. रशिया ज्या पद्धतीचे लँडर आणि रोव्हर चांद्रयान-२ मोहिमेसाठी पाठवणार होते. त्याने वेगवेगळया मोहिमांमध्ये अडचणी निर्माण केल्या होत्या. रॉसकॉसमॉसला डिझाईनमध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागल्या. नवीन प्रस्तावित डिझाइन सुद्धा चांद्रयान-२ साठी अयोग्य होती. अखेर रशियाने या सहकार्य करारातून माघार घेतली. त्यामुळे इस्रोसमोर स्वत:चा लँडर आणि रोव्हर बनवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अखेर भारतीय वैज्ञानिकांनी अथक मेहनतीने स्वदेशी बनावटीचा लँडर आणि रोव्हर विकसित केला. त्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेला इतका विलंब झाला.
चांद्रयान-२ चे तंत्रज्ञान विकसित करत असताना इस्रोला मुख्य यानाच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला. २०११ साली आपण ज्या यानाचे प्रक्षेपण करणार होतो त्यापेक्षा अधिक चांगले डिझाइन, यान आपल्या शास्त्रज्ञांनी विकसित केले.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*🚀अपयशाचा सामना कसा करायचा? अब्दुल कलाम यांचे ‘ते’ शब्द*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*अपयशाची भावना सलत असली तरी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे ते शब्द हिम्मत वाढवणारे आहेत.*
लोकसत्ता ऑनलाइन |Updated: September 7, 2019 2:54 pm
विक्रम लँडरचे चंद्रावर यशस्वी लँडिंग होऊ शकले नाही. त्यामुळे अनेकांच्या मनाला आज रुखरुख लागली आहे. संपूर्ण देश या क्षणाकडे डोळे लावून बसला होता. चांद्रयान-२ मोहिमेतील हा अत्यंत महत्वाचा आणि खडतर टप्पा होता. अनेकांच्या मनात आज अपयशाची भावना सलत असली तरी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे ते शब्द हिम्मत वाढवणारे आहेत. अपयशाचा सामना कसा करायचा ते शिकवणारे आहेत.
अब्दुल कलाम यांनी एका कार्यक्रमात १९७९ साली अपयशी ठरलेल्या SLV-3 सॅटलाइट लाँचच्या प्रक्षेपणाचा अनुभव सांगितला होता. अब्दुल कलाम त्यावेळी SLV-3 चे प्रकल्प संचालक तर प्राध्यापक सतीश धवन इस्रोचे चेअरमन होते. २०१३ साली एका कार्यक्रमात अपयश कसे हाताळायचे यावर बोलत असताना अब्दुल कलाम यांनी १९७९ सालच्या SLV-3 चे उदहारण दिले होते. ते १९७९ चे वर्ष होते. मी प्रकल्प संचालक होतो. उपग्रहाला अवकाशात सोडण्याची आमची मोहिम होती.
हजारो लोकांनी १० वर्ष मेहनत केली होती. मी श्रीहरीकोट्टा येथे पोहोचल्यानंतर मिशनचे काऊंटडाऊन सुरु झाले. संगणकाची सिस्टिम उपग्रह प्रक्षेपणाची परवानगी देत नव्हती. पण मी प्रकल्प संचालक होतो. मी प्रक्षेपणाचा निर्णय घेतला असे कलाम म्हणाले. तज्ञांची कलाम यांच्या निर्णयाला संमती होती. कारण त्यांच्या कॅलक्युलेशननुसार प्रक्षेपण यशस्वी होणार होते. त्यामुळे कलाम यांनी संगणकाच्या संकेतांकडे दुर्लक्ष करुन प्रक्षेपणाचा निर्णय घेतला.
प्रक्षेपणामध्ये एकूण चार टप्पे होता. त्यातील पहिला टप्पा व्यवस्थित पार पडला. दुसऱ्या टप्प्यात मात्र गणित गडबडलं. उपग्रह अवकाशात जाण्याऐवजी बंगालच्या उपसागरात कोसळला असे कलाम म्हणाले. संगणकाच्या वॉर्निंगकडे दुर्लक्ष करुन प्रक्षेपणाचा निर्णय मी घेतला होता. मी पहिल्यांदा अपयशी ठरलो होतो. पण अपयश कसे हाताळायचे? यश मी मॅनेज करु शकतो पण अपयशाचा सामना कसा करायचा? असा प्रश्न त्यावेळी समोर होता.
त्यावेळी इस्रोचे तत्कालिन प्रमुख सतीश धवन यांच्यासोबतच्या पत्रकारपरिषदेचा अनुभव कलाम यांनी सांगितला. सतीश धवन यांनी मोहिमेच्या अपयशाची सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली. आमच्याकडे चांगली टीम आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी आम्ही नक्की यशस्वी होऊ अशी त्यांनी उपस्थितांना खात्री दिली असे कलाम म्हणाले.
पुढच्याच वर्षी १८ जुलै १९८० रोजी कलाम यांच्याच नेतृत्वाखाली त्याच टीमने रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. त्यानंतर धवन यांनी मला पत्रकार परिषद घ्यायला सांगितली. त्या दिवशी मी खूप महत्वाचा धडा शिकलो. अपयश येते तेव्हा संस्थेचा प्रमुख त्याची जबाबदारी स्वीकारतो आणि यश मिळते तेव्हा त्याचे श्रेय टीमचे असते. पुस्तकातून मला जे शिकायला मिळालं नाही तो व्यवस्थापनाचा एक उत्तम धडा मी अनुभवातून शिकलो असे कलाम त्या कार्यक्रमात म्हणाले होते.
༶༺𖠷◈═══❀═══◈𖠷༻༶
*🚀‘चांद्रयान-२’बद्दल अब्दुल कलाम यांनी १० वर्षांपूर्वीच दिला होता सल्ला, म्हणाले होते…*
~~~~~~~ *srk* ~~~~~~~
*२२ जुलै रोजी चांद्रयान अवकाशात झेपावले होते*
लोकसत्ता ऑनलाइन |Updated: September 7, 2019 12:35 am
NEXT
‘चांद्रयान-२’बद्दल अब्दुल कलाम यांनी १० वर्षांपूर्वीच दिला होता सल्ला, म्हणाले होते…
सर्व काही संपलेलं नाही! न्यूयॉर्क टाइम्सकडून इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक
Chandrayaan-2 Moon Landing : उम्मीद पर दुनिया कायम; 'विक्रम'शी संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न
हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने १५ जुलै रोजी उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलेले चांद्रयान-२ चे प्रक्षेपण २२ जुलै रोजी झाले. ‘जीएसएलव्ही मार्क ३’ प्रक्षेपकाच्या सहाय्याने दुसऱ्या प्रयत्नात चांद्रयान २ अवकाशात झेपावले. उड्डाण यशस्वी झाल्यानंतर मजल दरमजल करत ४८ दिवसानंतर आज चांद्रयान २ हे प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशस्वी उड्डाणापासूनच अनेक भारतीयांना देशाचे माजी राष्ट्रपती आणि ‘भारताचे मिसाइल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आवर्जून आठवण येताना सोशल नेटवर्किंगवर पहायला मिळत आहे. याच ‘चांद्रयान-२’ मोहिमेबद्दल कलाम यांनी एक महत्वाचा सल्ला दहा वर्षापूर्वीच दिला होता.
डॉ. कलाम यांनी ‘चांद्रयान-२’ मोहिमेबद्दल दहा वर्षापूर्वीच इस्रो आणि नासाला सल्ला दिला होता. २००८ साली भारताने चंद्रावर पाठवलेल्या ‘चांद्रयान-१’वरील एमआयपीने (मून इमपॅक्ट प्रॉब) चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची नोंद केली होती. नासानेही ‘चांद्रयान-१’च्या या संशोधनाला दुजोरा दिला होता. ‘चांद्रयान-१’च्या यशानंतर भारताने चंद्रावर आणखीन एक मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळेस केवळ चंद्राच्या कक्षेत जाऊन निरिक्षण करणाऱ्या यानाऐवजी चंद्रावर यान उतरवण्याचा इस्त्रोचा इरादा होता. त्यानुसारच ‘चांद्रयान-२’ची आखणी करण्यात आली असून चंद्रावर यान उतरवण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. ‘चांद्रयान-१’ च्या यशानंतर वर्षभराने मुंबईमध्ये झालेल्या ”चांद्रयान: आश्वासने आणि चिंता’ या विषयावरील परिसंवादामध्ये कलाम यांनी आपले मत मांडले होते. ‘चंद्रावर पाण्याचा अंश सापडल्याच्या भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या एमआयपीच्या दाव्यावर सध्या संशोधन सुरु आहे. नासाने भारताच्या ‘चांद्रयान-२’वर रोबोटीक पेनिटेटर (पृष्ठभागावर खड्डा पाडू शकणारा रोबोट) लावायला हवा. त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अंश आहेत का याचा अधिक योग्य पद्धतीने अभ्यास करता येईल,’ असा सल्ला कलाम यांनी यावेळी नासा आणि इस्त्रोला दिला होता.
‘इस्त्रो आणि नासाने भविष्यातील ‘चांद्रयान-२’साठी एकत्र येऊन काम करावे असा मी सल्ला देईन. ‘चांद्रयान-२’वर नासाने रोबोटीक पेनिटेटर बसवावा. मी नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीला भेट दिली. त्यावेळी तेथील शास्त्रज्ञांनी मला आणि माझ्या सोबतच्या भारतीय वैज्ञानिकांना ‘मून मिनरलॉजी मॅपर’च्या (एमथ्री) माध्यमातून सापडलेली माहिती दिली होती,’ असं कलाम यावेळी म्हणाले होते.
याच परिसंवादात कलाम यांनी अंतराळ संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना २०५० पर्यंत एवघ्या एक किलोग्राम वजनाचे यान तयार करता येईल असा प्रयत्न करावा तसेच यान निर्मितीचा खर्च २० हजार डॉलरवरुन २ हजार डॉलरपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करावा असे दोन महत्वाचे सल्ले दिले होते.
२००३ साली कलाम यांना ‘इस्त्रो’च्या ‘चांद्रयान-१’च्या उद्देशांबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ”चांद्रयानाच्या मदतीने चंद्राची माहिती घेतल्यास संपूर्ण देशात खास करुन तरुण वैज्ञानिक आणि लहान मुलांमध्ये नवउर्जा संचारेल. भविष्यात इतर ग्रहांना भेटी देण्याची ही केवळ सुरुवात आहे याबद्दल मला खात्री आहे,’ असं मत नोंदवलं होतं.
*नासाने केली ही मदत*
‘चांद्रयान-२’मधील ‘रोव्हर प्रग्यान’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून अगदी कलाम यांच्या सल्ल्याप्रमाणे नासाकडून त्यामध्ये पृष्ठभाग खोदणारा रोबोट लावण्यात आला नसला तरी नासाकडून देण्यात आलेली लेझर प्रणाली या यानात वापरली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाबरोबरच चंद्र आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षणासंदर्भात अभ्यास करता येणार आहे. ‘रोव्हर प्रग्यान’ हे सहा चाकी व्हेइकल असून त्यामध्ये छोट्या आकाराचा अल्फा पार्टीकल एक्स रे स्केक्टोमीटर आहे. याच्या मदतीने चंद्रावरील पृष्ठभाग आणि दगड कशापासून तयार झाले आहेत याचा अभ्यास केला जाणार आहे.
‘चांद्रयान-२’ मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले आहे.
=====●●●=srk=●●●=====
⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺⎺
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
*सतीश कोळी*
*भद्रा मारुती खुलताबाद*
*📲 9158983616📱*
▂▃▅▓▒░🌹🙏🏽🌹░▒▓▅▃▂
0 Comments