वाढदिवसानिमित्ताने धन्यवाद

*कोणती पुण्ये अशी येती फळाला*
*जोंधळ्याला चांदणे लखडून जावे..* 

मित्रहो, 

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व प्रेमी स्नेहीजनांनी माझ्यावर  शुभेच्छा व प्रेमाचा वर्षाव करून कृतकृत्य केले. मी या पात्रतेचा आहे की नाही मला माहीत नाही, पण आई वडिलांचा आशीर्वाद व ज्याच्या उन्नती व विकासाचा वसा आपण घेतलाय त्या चिमूकल्या लेकरांचे आशीर्वाद पाठीशी उभे असल्याची जाणीव मात्र होते आहे. 

सर्वच क्षेत्रातील मित्र, सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांनी फोन करून , समाज माध्यमातून वा प्रत्यक्ष भेटून आज मला मी कुणीतरी स्पेशल असल्याचा आनंद दिला. 

विनोद राठोड, प्रकाश कांबळे या विदर्भातील मित्राच्या शाळेतून असेल किंवा गरखेड्याच्या शाळेतील विद्यार्थी मित्रांचे फोन असतील मला मनस्वी आनंद देऊन गेले. 

अनेकांनी मन भरून यावं असे शब्दाचे फुलोरे फुलविले.

आपल्या प्रेम व विश्वासास पात्र होण्याचा आशीर्वाद श्री घृष्णेश्वरांनी कायम ठेवावा हीच प्रार्थना ! 

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

Post a Comment

0 Comments