दि. ९ जून २०१९ रोजी मा. उदयराव शिंदे (राज्याध्यक्ष) यांनी सातव्या वेतन आयोगातील अनेक तृटी व त्रीस्तरीय वेतनश्रेणी ऐवजी १०, २०, ३० वर्षांनी सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात वित्त विभागाच्या मा. अपर सचिवांकडे निवेदन दिले होते. वित्त विभागाने शिक्षक संवर्गाचे प्रशासकीय विभाग म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन आवश्यक कार्यवाहीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविले आहे. त्याची प्रत नुकतीच प्राप्त झाली आहे. सर्व बांधवांच्या माहितीसाठी... विजय कोंबे (राज्य सरचिटणीस)
0 Comments