माझी शाळा,माझे उपक्रम 〇 गणिती गिरणी

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
   ➖🕳♍💲🅿🕳➖
        *रंगनाथ सगर,लातूर*
 ❱❱ *महाराष्ट्र शिक्षक  पँनल* ❰❰
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*चला सुट्टीचे गणिताचे*
            *साहित्य बनवू या...!!!*
 〇 *माझी शाळा,माझे उपक्रम* 〇     
 ════════════════
 *📚 गणिती गिरणी📚*
━━━━━━━━━━━━━━━━
        *गणिती गिरणी या शैक्षणिक साहित्यातून बेरीज.,वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया शिकवता येतात.*

  *🎉संबोध : -* सदरील गणिती साहित्याच्या आधारे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व इतर क्रियांचा सराव देता येतो.

*🎉साहित्य :-* वापरलेल्या वहयाचे खपट, पांढरा कागद, फेविकॉल व कात्री.

*🎉मुलांचा सहभाग: -* एका वेळी एकच विद्यार्थी किंवा गटागटाने.

*🔸साहित्य तयार करण्याची कृती*
👉खपटाचे सहा गोल तयार करून घ्यावे.
👉खपटाचे तयार केलेल्या गोलांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे काडकीच्या साह्याने दोन खपटांना अडकवून घ्यावे.
👉पहिल्या गोलावर 0ते9 अंक लिहावे.
👉दुसर्‍या गोलावर +, -, ×, ÷ असे चिन्ह काढावे.
👉 तिसऱ्या गोलावर 0ते9असे अंक लिहावे.
👉चौथ्या गोलावर = असे गोलाकार लिहा.
👉 पाचव्या व सहाव्या गोलावर 0ते9असे लिहावे.
       अशाप्रकारे गणिती गिरणी तयार झाली.

*💎गणिती गिरणीच्या साह्याने गणिताचा सराव*.
*👉उदाहरणार्थ👇*
गणिती गिरणीवर ८+६=
हे गणित सोडवायचे आहे.
तर पहिल्या गोलावरून समोरच्या बाजूला ८.आणावे दुसर्‍या गोलावरून ६ आणावे , तिसऱ्या गोलवरील बरोबरच चिन्ह आणावे.
मुलांना गणित सोडावयास लावून १४ उत्तरासाठी पाचव्यातील १ तर सहाव्या गोलवरील ४समोर आणावे तेव्हा गणिती गिरणीवर
८+६=१४ हे उत्तर येईल.
        *याचप्रमाणे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रियांचा सराव साहित्याच्या मदतीने घेता येतो.*
      *गणिती गिरणी हे शैक्षणिक टाकाऊ वस्तूपासून बनवले आहे.*
📚━━━━msp-------------📚
         *रंगनाथ सगर, लातूर*
       *महाराष्ट्र शिक्षक पँनल*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
  ┄─┅━━♍ 💲🅿━━┅─┄

Post a Comment

0 Comments