२९ एप्रिल शिवरायांनी शुग्रपूर जिंकले



धार आणि देवासचे पवार ( " सेनाबारासहस्त्री " , " विश्वासराव " ) धार आणि देवासच्या घराण्यांचा संबंध राजपूत परमार घराण्याशी आहे . साबूसिंग ऊर्फ शिवाजी पवार हे या दोन्ही घराण्याचे मुळ पुरुष आहेत . सन १६५७ साली कल्याणवरील स्वारीत ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सामील झाले होते . कल्याणच्या लढाईत त्यांनी मोठा पराक्रम गाजविला . साबूसिंग यांना छत्रपती शिवाजीराजेंनी सुप्याची पाटीलकी दिली होती . साबूसिंगाचा सुप्याजवळील हंगे गावातील एकालढाईत सन १६५८ साली मृत्यू झाला.साबूसिंगाचे पुत्र कृष्णाजी यांनी प्रतापगडच्या रणसंग्रामात ( इ . स . १० नोव्हेंबर १६५९ ) गाजविलेल्या पराक्रमाबदल शिवाजी महाराजांनी त्यांना कणगी व करणगांव ही दोन गावे इनाम म्हणून दिली . शिवाजी महाराजांनी कृष्णाजीना सन १६७७ साली आपल्या खास पागेचे सरदार बनविले . कष्णाजींचे पत्र बुबाजी , रायाजी आणि केरोजी यांनी छत्रपती शिवाजीराजे सोबत दक्षिण दिग्विजय नोठी कामगिरी केली होती . बुबाजी हे वडिलांप्रमाणे छत्रपती शिवाजीराजेच्याखास पागेचे सरदार होते.संताजी घोरपडे आणि हिम्मतखान यांच्यातील युध्दावेळी बाजी आणि केरोजी यांनी संताजींच्या साहाय्यार ऊन हिम्मतखानावर हल्ला केला ; त्यामुळे हिम्मतखानाचा पराभव झाला ( जुलै १६९६ ) , छत्रपती राजाराम महाराज यांनी या कामगिरीबद्दल बुबाजीस ' विश्वासराव ' तर केरोजीस ' सेनाबारासहस्त्री ' ही पदवी दिली . पुढे खानदेशान ' मोगलांबरोबर झालेल्या युध्दात बुबाजी पकडले गेले . मोगलांकडे चाकरी करण्यास नकार दिल्यामुळे मोगलांनी त्यांच अशीरगड किल्ल्याच्या ( जिल्हा ठाणे ) बुरुजामध्ये चिणून हत्या केली.बुबाजींचे दोन्ही पुत्र काळोजी आणि संभाजी हे आपल्या वडिलांप्रमाणेच पराक्रमी होते . त्यांनी आपल पराक्रमाने माळवा प्रांतात मोठा जम बसविला होता ( सन १६९६ ) . ताराबाईंच्या कालखंडात काळोजी आणि संभाजी पवार बंधूनी माळव्यातील मोगलांच्या ताब्यातील बुन्हाणपूर , खरगोण , मांडवगड आदी अनेक मुलांवर हल्ला कर मोगलांचा पराभव केला ( सन १७०३ ) , काळोजींचा मृत्यू सन १७२६ साली झाला .छत्रपती शाहूंच्या कालावर्ध काळोजीच्या चार पुत्रांनी कृष्णाजी , तुकोजी , जिवाजी आणि मानाजी तसेच संभाजींच्या पुत्रांनी उदाजी , आनंदराव, मालोजी पवार यांनी मोठा पराक्रम गाजविला.कृष्णाजीस शाहूंनी सरंजाम दिला पवार बंधूनी पेशव्यांसोबत दिल्लीच्या मोहिमेत ( सन १७१८ ) सदच्या पालखेडच्या लढाईत ( सन १७२७ - २८ ) मोठे शौर्य गाजविले . कर्नाटकातील चित्रदुर्गच्या कृष्णाजा पवार यांनी सेनापती त्र्यंबकराव दाभाडेसोबत मोठा पराक्रम गाजविला . या कामागरावल शाहूना त्यांना ' सरसूभा ' हा किताब दिला . सन १७३० साली पेशवे आणि शाहूंचे सेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांच्यात माळव्यातील वर्चस्वावरून युध्द झाले.त्यामध्ये उदाजी , आनंदराव आणि मालोजी पवार हे सेनापती त्र्यंबकराव दाभाडच्या बाजूने लढले . गुजरातेतील डभई येथे झालेल्या या लढाईत ( इ . स . १ एप्रिल १७३० ) सेनापती त्र्यंबकराव दाभाडे आणि मालोजी पवार ठार झाले.या लढाईनंतर पेशव्यांच्या बाजूने लढणारे कृष्णाजी पवार यांच्याकडे शाहूंनी गुजरातेतील काही महाल सापविले . तर त्यांचे लहान भाऊ मानाजी यांना त्या प्रांताची सरदारकी दिली.शाहूंनी सन १७३२ साली उदाजींची नेमणूक ' हुजुरातिचे सरदार म्हणून करून त्यांच्याकडे गुजरात प्रांतातील खाजगीकडे ठेवलेल्या प्रांताचा कारभारा दिला.माळवा जिकल्यानंतर पहिल्या बाजीरावांनी आनंदराव पवार यांना धारचा मुलूख सोपविला . तर उदाजींचे बंधू तुकोजीराव पवार आणि जिवाजी पवार यांना देवासचा मुलूख सोपविला .तुकोजीराव देवासच्या थोरल्या पातीचे संस्थापक होते ; तर जिवाजीराव देवासच्या धाकट्या पातीचे संस्थापक होते . धारचे आनंदराव पवार यांचा मृत्यू चारच वर्षात झाल्यामुळे त्यांचे पुत्र यशवंतराव यांचेकडे धारचा मुलूख आला . यशवंतराव तसेच तुकोजीरावांनी नंतरच्या अनेक मोहिमेत पेशव्यांची साथ दिली ( सन १७३७ दिल्लीवरील स्वारी , सन १७३८ भोपाळचे युध्द ) . चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली इ . स . १६ मे १७३९ रोजी मराठ्यांनी वसईवर चाल केली होती . त्यात देवासच्या तुकोजी पवारांनी मोठा पराक्रम गाजविला.या कामगिरीबद्दल शाहू महाराजांनी तुकोजीरावांना ‘ सेनासप्तसहस्त्री ' हा किताब आणि जरीपटक्याचा मान दिला .तुकोजीराव यांना पुत्रसंतती नसल्यामुळे त्यांनी बुवाजीराव पवार यांचा थोरला मुलगा कृष्णाजीराव यास दत्तक घेतले . मराठयांच्या राजपुताना , बुंदेलखंड , रोहिलखंड या प्रांतांवरील स्वारीत तुकोजीराव होते . कुभेरीच्या वेढ्यात ( मार्च १७५४) तसेच नागोरच्या वेढ्यात तुकोजीराव सामील होते . वेढा चालू असतानाच नागोर येथे त्यांचे नोव्हेंबर १७५४ साली निधन झाले..पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या बाजूने लढताना धारचे यशवंतराव कामी आले ( सन १७६१) खर्ड्याच्या ( जिल्हा अहमदनगर ) लढाईत ( फेब्रुवारी - मार्च १७९५ ) पेशवे , रघुजी भोसले , होळकर , शिंदे आणि पवार । यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला . या लढाईत विश्वासराव घराण्यातील राणोजी पवार थोरल्या पातीचे दुसरे तुकोजीराव , नगरदेवळ्याचे दुसरे शिवराव आणि मलठणचे मल्हारराव आदी प्रमुख पवार मंडळी सामील होती पवारांच्या पराक्रमामुळे माळव्यात मराठी सत्ता टिकून राहिली .

Post a Comment

0 Comments