रायरेश्वरला शपथ


🚩
स्वराज्याच्या शपथेसाठी शिवाजीराजे
तयार होते,
मावळे गोळा झाले, तयारी झाली, जागा ठरली भोरच्या रायरेश्वरला शपथ घालायची.
शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ माँसाहेब यांचा आशीर्वाद घेऊन राजांनी मावळ्यांना स्वराज्य काय आणि त्या स्वराज्याची किंमत काय हे तरुण वयातच त्यांच्या मनात बिंबवले.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ हो.
बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती.
सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली👌
🚩
गडांवरुनी इतिहास बोलतो ,
रण मर्दानी जातीचा 
तो वीर एक जन्मला शिवाजी ,
वाघ मराठी मातीचा ||धृ||
✍️
भारत भू च्या उरावरी क्रूर,
नाचत होता म्लेंछ कसा
लचके तोडून विद्ध जाहला,
देशधर्म तो कधी असा
धूळ झटकावून पुर्व दिशेने,
विजय रंग तो उधळविला
तारण्यास बहू हिंदू जना,
अवतार शिवाने प्रकटविला ||1|| .
✍️
आग पेटली वणवा भडकला
होम पेटे स्वातंत्र्याचा
तो वीर एक जन्मला शिवाजी ,
वाघ मराठी मातीचा
✍️
तलवार भवानी सळसळूनी,
दुष्टा भिडला सह्याद्री
पोलाद मातीचे अलग करुनी,
मजबुत बनलेल्या छाती
तट्टस्वार ठठ्ठाच्या खड्गे ,
दुष्ट म्लेंछ तो मारियला
रणरंग मांडले मोठे जंगी,
शौर्यसागरा खवळविला
🚩
हर हर महादेव हर हर महादेव
घोष उडाला वीरगतीचा
तो वीर एक जन्मला राजा शिवाजी ,
वाघ मराठी मातीचा
🚩🚩🙏🙏🚩🚩

Post a Comment

0 Comments