
सुरतकर २३ एप्रिल १६८३ कळवितात की, "मोगलपादशाहा अद्यापि औरंगाबादेसच आहे, त्याने आपले सर्व सैन्य संभाजीराजा यांच्या पारिपत्यार्थ पाठवले होते. परंतु ते त्याने माघारी घेतले आहे.हा एकाएकी निर्णय घेतल्याने लोकांत त्याबद्दल तर्ककुतर्क चालू आहेत...मोगलाने संभाजीराजे यांच्या विरुद्ध पाठविलेले सर्व सैन्य माघारी घेतले आहे, आणि आरमारचा बराच मोठा भाग येते परत आला असुन राहिलेला आरमार लवकरच परतेल असा म्हणतात." वरील दिलेल्या पत्रावरुन १६८३ च्या पावसाळ्यापुर्वी औरंगजेबाची वृत्ती बरीच हताश झाली होती यात शंका नाही.त्यास जी कर्तृत्वाची घमेंड होती ती पुर्णपणे जिरली होती.त्याने दक्षिणेतील लढायांत व कारभारांत आपल्या मुलांना व सरदारांना शिवरायांच्या विरुद्ध मिळालेल्या अपयशाबद्दल जी दुषणे दिली होती त्यापेक्षाही जास्त फजिती त्याची आपल्या मुलांसमोर व सरदारांसमोर होत आहे हे पाहुन त्याचे मन साहजिकच अवमानाने त्रस्त झाले होते; आणि हि परिस्थिती संभाजीराजासारख्या एका लहान तरुण राजाने केलली पाहुन तर त्याला आपल्या मुलांच्या बाबतीतील आताताईपणाची जाणीव जशी होऊ लागली होती तशीच त्याबरोबर त्याची वृत्ती अधिकाधिक चिडखोर बनु लागली होती. हे त्याच्या विजापुर व गोवळकोंडाच्या लढायांतील हालचालींवरुन स्पष्ट होते.
0 Comments