#छत्रपती_शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला मिळतात.
मंदिरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ही पहायला मिळते. .
हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार !!
ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय.
या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात छत्रपति शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात. म्हणजे एखाद्या मावळयांने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. .
असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही. .
🚩🙏🙏 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🙏🙏🚩
0 Comments