#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१६६१
छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१६८०
राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोलावले आहे.
कित्येकास कैदखान्यात घालून कित्येकास बडतर्फ केले आहे.
महाराजांच्या मृत्युनंतर २४ - २५ दिवसातला हा प्रकार आहे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१७३१
बेलापूरची लढाई🔥
मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली.
३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार
२८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२८_एप्रिल_१७४०
(वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२)
मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने पेशवे बाजीराव बल्लाळ यांनी अखेर चा श्वास घेतला.
मराठी दौलतीचा काळा दिवस.
🚩मराठा साम्राज्याचे पंतप्रधान श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या रणधुरंदर योद्ध्याचा नर्मदेच्या तिरावर रावेरखेडीत श्वास थांबला🚩
हिंदुस्तानभर मराठ्यांचा दरारा निर्माण करणारं हे झंझावाती वादळ आजच्या दिवशीं शांत झाल.🚩
छत्रपतींच्या सेवकाला पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन.
🚩🏇🚩🏇🚩

0 Comments