#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_एप्रिल_१६६१
( वैशाख शुद्ध एकादशी, शके १५८३)
शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला.
तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे.
हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला.
चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला.
शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता.
आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते.
संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला.
पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले.
महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले.
होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना.
मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला.
घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला.
महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२९_एप्रिल_१६८२
छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे.
या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली.
त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल १६८२ रोजी कळवीले की.
"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."
🚩🏇

0 Comments