*‘श्री महादेव श्री तुळजाभवानी ।।* *शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू: ।।*
*एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयती ।।’*
असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे. या श्लोकाचा मराठी अनुवाद *‘श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वत: श्री विष्णूच होय. त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे. तिचा जयजयकार असो,’* असा होतो.सदर श्लोकाचा उल्लेख आपल्याला सभासद बखरीत ही मिळतो. पण मी आपणांस रायगडाची जीवनगाथा मधील ss देत आहे. त्यामध्ये ही राजमुद्रा मधील श्लोक आपल्याला बघायला मिळतो..आजवर ही मुद्रा कुठल्याही दस्तावेज वर उमटवली गेलेली नाही..बहुतेक केली ही असेल पण तसा कागद अजून आपल्या
ला सापडत नाही.. ही मुद्रा बनवून घेतली तरी महाराजांनी जुनी राजमुद्रा चा वापर केलेला दिसून येतो..ह्यात शिवरायांच्या रुपात स्वतः श्रीविष्णू ह्या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले अस स्पष्ट म्हटलेले दिसून येतं.

Post a Comment

0 Comments