#गडांवरचे #शिलालेख गडांवर फिरताना आपल्याला बुरुज, पाण्याची टाकी, दरवाजे, तटबंदी, राजवाडे, सदर यांचे अवशेष दिसतात. पण काही गडांवर आपल्याला शिलालेख पहायला मिळतात. हे शिलालेख म्हणाल तर "इतिहासातला एक दुर्मिळ खजिनाच!!" कारण ह्या शिलालेखांमुळे तो गड कधी बांधला, कोणी बांधला, कधी जिंकून घेतला किंवा गडावर कोणकोणत्या वास्तू आहेत. याची माहिती मिळते. काही शिलालेख अजूनही सुस्थितीत आहेत तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अश्याच काही गडांवरच्या शिलालेखांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला आहे. १) #रायगड : ।। श्री गणपतयेनमः ।।
।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।।
।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।।
।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।।
।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। वापीकूपतडागराजिरू ।।
।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्
रसदनै ।।
।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।।
।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समु
ज्जृंभते ।। अर्थ :-
सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद
सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला.
या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा,
रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे,
ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो ll
२) #अवचितगड:
⛳ अवचित गडावरील दक्षिण बुरुजातील शिलालेख ⛳
ओळ क्रम १ श्री गणेशा २ यनमा श्री बाप ३ देव सके ४ १७१८ नळना ५ मस्तेय चैत्र श्रु ६ ध प्रतिपदा
असा आहे...
(माहिती आभार : मनोज थिटे, सौरभ घरट)
३) #लोहगड:
श्री गणेशयनमः
गणेश दरवाजा बांधला बाळाजी जनार्दन फडणीस विद्यमान धोंडो बल्लाळ निजसुरे प्रारंभ शके १७१२ साधारण नाम संवत्सरे अस्वीन शुध ९ नवमी रवीवार समाप्त शके १७१६ आनंदनाम सवत्सरे ज्येष्ठ सुध त्रयोदशी बुधवार कताव्य जयाजी धनाराम गवडी त्रिवकजी सुतार
४) #सज्जनगड
फार्सी वाचन
दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख 3
दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही
मराठी अर्थ
ऐश्वर्य तूझ्या दारातून सर्वांना तोंड दाखवत आहे
हिम्मत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे
तू
0 Comments