शिवाजी महाराज आणी हुंडी - भाग १

शिवाजी महाराज आणी हुंडी - भाग १
(Shivaji Maharaj & Bills Of Exchange - Part 1)

आज बारावी वाल्यांचा Accounts पेपर. १२वी Accounts म्हणलं की Bills Of Exchange नावाचा धडा आठवतो. Drawer, Drawee, Bill Retained, Discounted, Honoured वगैरे शब्द डोक्यात फिरु लागतात. Bill Of Exchange आज व्यापारी दृष्ट्या महत्वाचे आहे. ते जसं आज महत्वाचं आहे, तसंच शिवाजी महाराजांच्या काळातही होतं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगिज लोकं आपली व्यापारी मुळं इथे रुजवायला बघत होती. शिवाजी महाराजांच्या दरार्या मुळे त्यांना चाप बसला होता व ते महाराजांच्या नियंत्रणाखाली होते. सदर कथेत महाराज इंग्रजांची कशी गंमत करतात आणी त्यांना कसं लुबाडतात याचं वर्णन केलं आहे...
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी मुंबई च्या इंग्रजांकडुन नाणी पाडायला, भांडी बनवायला तांबं विकत घेतलं होतं. पण ते खरेदी करताना त्यांना ते म्हणाले की रायगडावर नाणी नाही, तर तुम्ही ही हुंडी (Bill Of Exchange) घ्या आणी ती गोवळकोंड्याला न्या. तिकडे आमची शाखा आहे, आमच्या माणसाला हा कागद दाखवला की तो तुम्हाला तुमचे पैसे देईल. 

मुंबई चा त्यांचा कुरीयर वाला गोवळकोंड्याला जात नसे. त्यामुळे मुंबई च्या इंग्रजांनी तो कागद सुरतेच्या इंग्रजांकडे पाठवला, व त्यांचा कुरीयर वाला गोवळकोंड्याला गेला. तिकडे त्याने त्या शाखेतल्या माणसाला तो कागद दाखवला आणी पैसे मागितले. पण तो माणुस म्हणाला की तुम्हाला पैशे देयचा अधिकार मला नाही, तो अधिकार ज्यांच्याकडे आहे ते प्रल्हाद निराजी रायगडावर गेलेत. ते येउसपर्यंत थांबा नाहीतर रायगडावर जा. हा कुरीयरवाला सुरतेला आला. सुरत वरनं तो कागद मुंबई ला पाठवला गेला.
मुंबई च्या इंग्रजांना कळालं की महाराज आपल्याला नुसतं फिरवतायत. त्यांनी त्यांच्या माणसाला- नारायण शेण्व्याला रायगडावर पाठवलं.

 नारायण शेण्वी हा दुभाषीक होता. त्यावेळी रागडला यायचं म्हणजे मुंबई वरनं पेण पर्यंत जहाजाने जायचं, मग तिकडन निझामपुर माणगाव करत रायगडला येयचं. हा सगळा प्रवास करत नारायण पायथ्याला-पाचाड ला पोहोचला. पण चौकशी केल्यावर त्याला समजलं की गडावर महाराज नाहीत, ते बाहेर गेलेत व कधी येणार हे माहित नाही. त्याने पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना भेटायचे ठरवलं. पण ते कामात व्यस्त असल्याने त्याला १ महिना खालीच थांबवलं. 

महिनाभरानंतर वरती बोलवलं. त्याला त्यांनी विचारलं की काय झालं, त्याने सगळा प्रकार सांगीतला आणी म्हणाला की प्रल्हाद निराजी रायगडावर आहेत ना? मोरोपंत म्हणाला आता ते गेले परत गोवळकोंड्याला. नारायण म्हणाला की सारखं सारखं तिकडे कोण जात बसेल, तुम्ही आमचे पैशे इथेच द्या. मोरोपंत म्हणाले, अरे इकडे पैशे नाहीत म्हणुन तर तुला तिकडं पाठवलं होतं.

पण शेवटी मोरोपंत म्हणाले की मी ह्या राज्याचा पंतप्रधान आहे आणी आम्हाला तुमच्याशी व्यापारी संबंध कायम ठेवायचेत, तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. नारायण म्हणाला काय? की आमची अलिबाग ला काही गोदामे आहेत आणी तिथली लोकं आम्हाला कर म्हणुन नारळ, सुपारी, भात वगैरे देतात. तर आम्ही आमच्या अधिकार्याला फर्मान कढतो, तो तुम्हाला तेवढ्या किमतीचं सामान देईल. बर आता पैश्याच्या बदली नारळ, सुपारी भात घेयचा अधिकार नारायण कडे नव्हता. त्यामुळे तो परत सगळा प्रवास करत मुंबई ला आला.

नारायण ने मुंबई च्या इंग्रज साहेबाला सगळा वृत्तात सांगितला व मोरोपंतांचा उपायही सुचवला. इंग्रज साहेब म्हणाला, हे सगळी लोकं आपल्यला बनवतायत. ते आपल्याला नारळ, भात, सुपारी देयचं फर्मान काढतील, पण आतुन लोकांना सुचना देतील की पुढचा आदेश येउसपर्यंत गोदामात माल टाकायचा नाही. आणी गोदामात काहीही नसल्याने हे आपल्याला काहीच देणार नाहीत.
आता मुंबईचे इंग्रज ह्या वेळेस काय करतात ते बघुयात उद्याच्या दुसर्या आणी शेवटच्या भागात...

Post a Comment

0 Comments