माझा अभ्यास व पालकांची भूमिका

〇 माझी शाळा माझे उपक्रम 〇 
_💫माझा अभ्यास व पालकांची भूमिका 💫_   
           📚लेख-चौथा📚_════════════════
 *_📚 स्वयं अधयनात पालकांचा सहभाग📚_*
━━━━━━━━━━━━━━━━
_अभ्यासक्रमात निर्धारीत केलेल्या क्षमता विद्यार्थ्यांमधे विकसित करण्यासाठी शिक्षक अध्यापन करीत आसतात. विद्यार्थ्यांनी सर्व क्षमतेवर प्रभुत्व मिळवावे यासाठी शिकवून झालेल्या भागाचे सुनियोजित सरावाच्या साह्याने अर्थ पुर्णरित्या दृढीकरण साचेबद्ध पध्दतीने स्वयं अधयनआतूनच होत आसते. त्यासाठी शिक्षकासोबत पालकांचे पण काम आहे विद्यार्थ्यांना स्वयअध्ययनात मदत करावी._
  *_" विद्यार्थी जीवन हेच आपल्या उत्कर्षाचे खरे जीवन आहे. हा काळ ही मानवी जीवनाची परममंगल नादी आहे बलदंड व्हा, अथांग व्हा, अभ्यासू व्हा व स्वयअध्ययनातून स्वयंभू बना"_*
      _असे स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात. आजचा काळ गतिमान आणि गुंतागुंतीची आहे. या वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या पाल्याला क्षणोक्षणी, पावलोपावली अभ्यासू वृत्तीचा वसा घेऊन विचार करण्याची गरज आहे. स्वयअध्ययनासाठी मुलांना तयार प्रोत्साहित करण्याची वेळ आज शिक्षक - पालकांवर आली आहे. म्हणून तर म्हणतात,_ 
        *_"शिक्षकांचे काम अभ्यासाची योग्य दिशा देणे व लक्ष देणे आहे तर_*
         *_पालकांचे काम लक्ष ठेवणे व मुलांना योग्य संधी देणे_* 
        _स्वयअध्ययन म्हणजे अभ्यासासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच विविध विषयांचा अभ्यास करणे, दुसर्‍याच्या नोट्स अथवा बाजारपेठेतील रेडिमेड नोट्स न हाताळता स्वतःच्या नोट्स तयार करणे होय. याशिवाय वार्षिक, सहामाही, मासिक व दैनंदिन अभ्यासाचे नियोजन करणे, आकलन, साठवण व वेळच्या वेळी पालकांच्या मदतीने उजळणी करुन अभ्यासात रममाण होणे म्हणजे स्वयअध्ययन पध्दतीचा वापर करणे होय._ 
*_💫स्वयअध्ययनात पालकांची भुमिका थोडक्यात खालील प्रमाणे सांगता येईल💫_*
======================
   _🥀पालकांनी आपल्या पाल्याला तुम्ही मुळीच शिकवू नका, शिकण्यासाठी त्यांना प्रेरीत, प्रोत्साहित करा व उत्साह द्या._ 
_🥀पालकांनी आपले विचार, इच्छा, आकांक्षा त्याच्या वर लादू नका, येता जाता त्याचा उध्दार न करता त्यांना बोलतं करायला लावा._
_🥀मुलांचे पाठांतर त्यांच्या शंका अडचणी, प्रश्न यांच्या कडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. तुम्ही फक्त मार्गदर्शक बना._
_🥀मुलांना हवं तेवढं शिकण्याची संधी, उर्मी, प्रेरणा देणे, योग्य दिशा दाखवून मुलांकडून स्वाध्याय करुन न देता त्याच्या कडून करुन घेणे हे आपले जबाबदार पालक म्हणून आपले काम आहे._
_🥀पालकांनी शक्यतो आज काल टिवहिशनची जी फॅशन आहे ती कमी करावी. टिवहिशनमुळे जी स्वयअध्ययनाची सवय मोडत आहे. केवळ मार्कांच्या फुटपट्ट्या लावून आपण जगातील समृद्ध ज्ञानी  समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय घोकंपट्टीच्या तंत्राने बोलके पोपट तयार होत आहेत पण या समाजाला चिंतनशील, अनुभवसंपन्न व ज्ञानी बनविण्याची गरज आहे. या स्पर्धेच्या युगात असाच विद्यार्थी स्वतःचे अस्तित्व निर्माण करु शकतो ज्याच्याकडे एकलव्यासारखी स्वय अध्ययनाची तळमळ आहे. हीआपल्या मुलांत पालकांनी निर्माण करावी._
_🥀पालकांनी आपल्या पाल्याच्या मनात स्वयअध्ययनाने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते हे ठासून भरावे._
_🥀पालकांनी मुलांना स्वयअध्ययनातून ज्ञानार्जनासाठी अभ्यास करायला लावून स्पर्धात्मक जगात टिकवण्यासाठी प्रयत्नशील आसावं._
_🥀स्वयअध्ययनाने मुलांच्या बुध्दीला चालना देवून मुलांतील दोष निर्मुलन करुन गुणसंचयातून प्रगती साधून ध्येयसिध्दीकडे वाटचाल करण्यासाठी पालकांनी आपली जबाबदारी पार पाडावी._ 
  
       *_📚पालकासाठी एक मी माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरा खुर्द शाळेत घेतलेला स्वयअध्ययनावर आधारित एक उपक्रम घेत आसतो तो म्हणजे उदयाला जो पाठ शिकवणार आहे त्यापाठावर मुलांना प्रश्न काढायला सांगून त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना लिहायला सांगतो जेणेकरून विद्यार्थी स्वतःपाठाचे वाचन करून प्रश्ननिमीॅती कौशल्य आत्मसात करतो व स्वतःच तो प्रश्नांची उत्तरे लिहत आसल्यामुळे त्याला कुण्या गाईड, नोट्स किंवा कुण्या  मार्गदर्शकावर अवलंबून राहण्याची गरज नाही तो स्वयअध्ययनातून आपली शैक्षणिक भुक भागवत आसतो या उपक्रमात आपली भुमिका फक्त मार्गदर्शकाची आसते तो कुठे आडत असेल तर थोडंस मदतीसाठी. त्यामुळे पालकांना विनंती असेल असं उपक्रम तुम्ही घरी घेतलात तो स्वयअध्ययनातून शिकेल._*

      शेवटी एवढेच म्हणेन, 
   *_या अभ्यासाच्या वळणावरती,_* 
         *_जरा थबकुनी मागे बघता_*, 
      *_कितीक संधी आम्हा खुणवती,_* 
       *_स्वयअध्ययनाची गट्टी करता._*

📚━━━━Ⓜ💲🅿━━━━📚
         *'_रंगनाथ सगर, लातूर_**
       *_महाराष्ट्र शिक्षक पँनल_*
     📞 *97 63 534721* 📞
   ════════════════
   ─┅━━♍ 💲🅿━━┅─

Post a Comment

0 Comments