डॉ.जयंत नारळीकर


डॉ.नारळीकर यांनी सर्वसामान्य माणसाचे अंतरिक्ष विज्ञानाची क्लिष्ट संकल्पना अगदी साध्या सोप्या भाषेत मांडून खगोलशास्त्रांच्या चिकित्सेचे मोठे दालन खुले केले
July 18,

डॉ. जयंत नारळीकर यांचा आज 84 वा वाढदिवस 19 जुलै  त्या संदर्भात थोडक्यात लेख!
देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.   विज्ञानासारखा   क्लिष्ट विषय सोप्या भाषेत मांडणारे डॉ.नारळीकर  यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी महाराष्ट्रातील  कोल्हापूर येथे झाला.

             नारळीकरांना गणिताचा वारसा वडीलांकडून व संस्कृतचा वारसा आईकडून मिळाला. डॉ. नारळीकरांचे शिक्षण वाराणसी येथे झाले. उच्च शिक्षण    त्यांचे  ब्रिटनमधील  केंब्रीज विद्यापीठात झाले. डॉ. नारळीकरांनी आपल्या  अलौकिक  बुद्धीमत्तेमुळे रँग्लर व खगोलशास्त्रांतील टायसन मेडल मिळवले. गुरुत्वाकर्षणावर संशोधन करुन नारळीकरांनी अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांतासारखाच सिद्धांत  मांडला. डॉ.नारळीकरांच्या संशोधनामुळेच ते  आंतरराष्ट्रीय  स्तरावर  शास्त्रज्ञ  म्हणून  ख्यातनाम झाले.  डॉ. नारळीकर मुंबई  येथील टाटा मूलभूत  संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे  प्रमुख झाले. डॉ.नारळीकर शास्त्रज्ञ  म्हणून  प्रसिद्ध  असले तरी मराठी साहित्यात त्यांनी  महत्त्वाची  भर टाकली आहे सर्वसामान्य  माणसाचे अंतरिक्ष विज्ञानाची क्लिष्ट  संकल्पना  अगदी साध्या सोप्या भाषेत मांडून खगोलशास्त्रांच्या चिकित्सेचे मोठे दालन त्यांनी  खुले केले. "यक्षाची देणगी " या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र  शासनाचा पुरस्कार  मिळाला. गेली चार दशके अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात  ते  संशोधन करीत आहे.  विज्ञानकथा , अंतराळातील भस्मासूर,प्रेषित , व्हायरस ,टाइम मशीनची किमया , याला जीवन ऐसे नाव,सारखे विज्ञानकथा पुस्तके  व  विज्ञानाची गरुडझेप , गणितातील गमतीजमती , विश्वाची रचना , नभात हसरे तारे सारखे अनेक  पुस्तके  लिहून त्यांनी  मराठी साहित्यात मोलाची भर टाकली. डॉ.नारळीकरांना महाराष्ट्रभूषण , पद्यभूषण ,  पद्यविभूषण , भटनागर  व बिरलासारखे मानाचे पुरस्कार  मिळाले आहे. डॉ.नारळीकरांना एक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की ," तुम्हाला नोबल पुरस्कार  का मिळाला नाही ? त्यावर त्यांचे उत्तर विनम्रतेचे होते. आपण काम करत राहायचे हा प्रश्नांचा आपण विचार करायचा नाही. महाराष्ट्रातील असे किमयागार शास्त्रज्ञ   नारळीकरांना वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा  !

Post a Comment

0 Comments