_जागतिक दिव्यांग (अपंग) दिन दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ३ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो._
_यंदा महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांगच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यांग मंत्रालय ३ डिसेंबरपासून कार्यान्वित होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य हे दिव्यान्गांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभ पणे पोहचवण्यासाठी या
विभागाची मदत होणार आहे.
समाजाला आपल्या या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा हा दिवस होय. आपण जे करू शकतो ते सर्व काही दिव्यांग बांधव देखील करू शकतात. म्हणूनच त्यांना सहानभूती नाही तर आपुलकीची गरज आहे. अपंग व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे अतिशय महत्वाचे आहे.
३ डिसेंबर रोजी जगभरामध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमआयोजित करण्यात येतात. *दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य (Divyang Day Slogan)* पुढे दिलेली आहे.
_● हक्क देऊ, संधी देऊ,_
_दिव्यांगाना प्रोत्साहन देऊ._
_● दिव्यांगाना देऊ संधी,_
_वाहील विकासाची नांदी._
_● सर्वांचा निर्धार,_
_दिव्यांगाचा स्विकार._
_● मिळून सारे ग्वाही देऊ,_
_दिव्यांगाना सक्षम बनवू._
_● दिव्यांगाचा सन्मान,_
_हाच आमचा अभिमान._
_● तुमचा आमचा एकच नारा, दिव्यांगाना देऊ सहारा._
_● ऊठ दिव्यांग जागा हो,_
_समाजाचा धागा हो._
_● समाजाला जागवू या,_
_दिव्यांगाना सक्षम बनवूया._
_● एकासारखं दुसर नसतं सर्वांना बरोबर घ्यायचं असतं ! दिव्यांग असो, वा अपंग सगळ्यांनाच पुढे न्यायचं असतं..!_
_● नको बोल सहानुभूतीचे, शिक्षण द्या दिव्यांगाना हक्काचे..!_
_● दिव्यांगाना समान संधी,_
_हिच प्रगतीची नांदी...!_
_● सामावेशित शिक्षण आले दारी, विशेष मुलांची प्रगती भारी._
_● समग्र शिक्षा अभियानाची निर्मिती, सामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांगांची उन्नती !_
_● हातात हात द्या,_
_विशेष मुलांना साथ द्या._
_● समाजाला जागवू या, दिव्यांगांना सक्षम बनवूया._
_● दया नको संधी द्या !_
_विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना सामावून घ्या._
_● डरने की क्या बात है। हम दिव्यांग के साथ है !_
_● दिव्यांगाचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण._
_● समावेशित शिक्षण, दिव्यांगाच्या हक्काचे रक्षण._
_● दिव्यांगाना शिकवू,
समाजात त्यांना टिकवू._
_● एकमेकांच्या सहकार्यने एकत्र येणार, दिव्यांगाचे निश्चित कल्याण होणार._
_● निरक्षरता निर्मूलनाचा एकच उपाय, सर्वांच्या शिक्षणाशिवाय नाही पर्याय._
_● दिव्यांगाना साथ दया, मदतीचा हात द्या._
_● एक-दोन - तीन-चार, दिव्यांग म्हणजे नाही भार, पाच-सहा-सात-आठ, अपंगांना दाखवा वाट._
_● अ-आई, ब- बाबा, अपंग सुदधा मिळवतात शिक्षणावर ताबा._
_● शिक्षणाचा कायदा, दिव्यांगाच्या शिक्षणाचा वायदा._
_● शिक्षणाचा अधिकार,
दिव्यांगाचा स्वीकार._
_● आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण दिव्यांगाचाही हक्क._
_● दिव्यांगाचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण._
_● सोडून देऊया वाईट अंधश्रद्धा चालीरीती, दिव्यांगाच्या शिक्षणाला देऊया गती._
_● दिव्यांगाना देऊ समान वागणूक, करूया त्यांच्या भावनांची जपणूक._
_● दिव्यांग मित्रांना सहानुभूती नव्हे, विश्वास दाखवा._
_● दिव्यांग बांधवांना सन्मानाचा, समानतेचा हक्क देऊया, चला, एक समतोल समाज घडवूया.._
_● सहानुभूती नको, आपुलकी दाखवा._
_● सहानुभूती नवे विश्वास देऊया, प्रत्येक दिव्यांगाला आपुलकीची साथ देऊया._
_● सहानुभूती नको, सहकार्य आणि आधार द्या._
_● मदतीसोबत संधीचा हात ठेवूया, दिव्यांग बांधवांसाठी सन्मानाचे स्थान ठेवूया._
_● बोलता येत नसलं म्हणून काय झालं, मला ही 'वाचा' आहे नां !_
_● ऐकता येत नसलं म्हणून काय झालं, मला ही 'जाणीव' आहे नां!_
_● दिसत नसलं म्हणून काय झालं, मला ही 'स्पर्श' आहे नां!_
_● बुध्दि नसली म्हणून काय झालं, मला ही 'समज' आहे नां !_
_● चालता येत नसलं म्हणून काय झालं,_
_माझ्यातही 'हिम्मत' आहे नां!_
_● दिव्यांग असलो म्हणून काय झालं, 'मी' ही एक 'माणूसचं' आहे नां.._
_● देऊनी त्यांना समान वागणूक,_
_करूया त्यांच्या भावनांची जपणूक._
*जागतिक दिव्यांग (अपंग) दिन 3 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो? - जागतिक दिव्यांग दिन विशेष*
_*जागतिक दिव्यांग इतिहास*_
_*जागतिक दिव्यांग (अपंग) दिन कधी साजरा केला जातो?*_
_सयुंक्त राष्ट्रसंघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले._
_सयुंक्त राष्ट्रसंघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते.जगभरातील संपूर्ण देशभरात या दशकामध्ये अपंगांच्या उद्धारासाठी योजना राबविण्यास भाग पाडले होते. या दशकाच्या शेवटी ३ डिसेंबर जागतिक अपंग दिन साजरा करण्याबाबत या दिवसाची निवड करण्यात आली होती. १९९२ च्या ३ डिसेंबर पासून जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो._
_RPWD ACT 2016 दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार अपंग या शब्दा ऐवजी आता दिव्यांग असा शब्द बदल करण्यात आला आहे. तेव्हा ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून देखील ओळखले जाते._
_३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे दिव्यांग व्यक्ती देखील सहजतेने कार्य करू शकतात. दिव्यांगत्वावर मात करून यशस्वी होता येते. यासाठी गरज असते प्रोत्साहनाची त्यानिमित्ताने समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, प्रभात फेरी, व्याख्याने, भाषण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून दिव्यांग व्यक्तींचा सन्मान केला जातो. त्यांच्या विषयी समाजातील घटकांमध्ये दिव्यांग विषयी जनजागृती करण्यात येते._
_जागतिक अपंग दिन दरवर्षी ३ डिसेंबर रोज का साजरा करण्यात येतो? या मागील पार्श्वभूमी जाणून घेऊया, दिनांक २० सप्टेंबर १९५९ रोजी बेल्जियम या देशामधील एका मोठ्या कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट झाला होता. या खाणीमध्ये लाखो मजूर काम करीत होते. या घडलेल्या दुर्घटना मुळे हजारो मजूर कोळशाच्या खाली गाडले गेले, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडले. मरण पावलेल्या किती तरी जास्त पटीने लोक जखमी झाले अनेक मृत्यूमुखी पडले. मरण पावलेल्या किती तरी जास्त पटीने लोक जखमी झाले. कित्येक मजुरांचे हात-पाय तुटले तर कोणाचे कायमचे कान बधीर झाले. कोळशाच्या धुरामुळे लोक कायमचे अंध झाले होते._
_बेल्जियम येथे घडलेल्या घटनेमुळे खाणीत मरण पावलेल्या कुटुंबाना तेथील नियमानुसार नुकसान भरपाई मिळाली, मात्र जे लोक जखमी व ज्यांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यांना कसल्याही प्रकारची मदत कोळसा खाण मालकाने दिली नाही. बेल्जियम सरकारने देखील याबाबत कसलीही मदत दिली नाही._ _कायमस्वरूपी विविध अपंगत्व आल्याने भरपाई तर मिळाली नाही, त्याचबरोबर त्यांचा रोजगार देखील बुडाला. त्यामुळे या मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला. या खाणीत काम करणारे मजूर मरण पावले तरच भरपाई मिळत असे, मात्र कोळसा खाणीत काम करत असताना कोणी मजूर जखमी झाला किंवा अपंग झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळत नसे . सर्वच खाणीत काम करणारे मजूर एकत्रित झाले आणि त्यांनी खान मालकाच्या विरोधात देशांमध्ये प्रचंड मोठे आंदोलन उभारले._
_या आंदोलनात अपंगत्व आलेल्या कामगारांना नुकसान भरपाई मिळावी व अपघात विमा लागू करावा अशी मागणी समोर आली. अशा प्रकारचे अपंगांच्या मागणीसाठी उभारले गेलेले हे जगभरातील पहिले आंदोलन ठरले त्यामुळे जगभरातील संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनाकडे गेले. शेवटी कोळसा खान मालक व बेल्अजियम सरकारला या अपंग लोकांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली व त्यांना योग्य तो मोबदला द्यावा लागला._
_या कोळसा खाणीत झालेल्या दुर्घटनेमुळे हजारो लोकांना अंधत्व, कर्णबधीर, अस्थिव्यंग या सारखे अपंगत्व आले होते._
_या दिवसाची आठवण म्हणून जागतिक आरोग्य संघटना (WHO) संघटनेने सन १९६२ या वर्षापासून मार्च महिन्यातील तिसरा रविवार हा जागतिक अपंग दिन साजरा करण्याचे ठरविले गेले. सुरुवातीचे काही वर्ष हा दिवस स्मृतिदिन व अपघात दिन म्हणूनच साजरा करण्यात येत होता. या कालावधीत अपंग व्यक्तींच्या स्वतःच्या हक्कासाठी त्यांच्या उद्धारासाठी अनेक संघटना निर्माण झाल्या त्यांच्या माध्यमातून आंदोलने होऊ लागले._
_बेल्जियम देशातील एका घटनेने जगातले सर्व अपंग बांधव एकत्र झाले सर्वच देशांमध्ये अपंगांसाठी विविध योजना असाव्यात कायदे असावेत म्हणून अपंगांनी आपल्या शासनाकडे मागण्या लावून धरल्या. या सर्व प्रकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) सन १९८१ हे वर्ष जागतिक अपंग वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले. पुढे सन १९९२ मध्ये राष्ट्रीय अपंग पुनर्वसन परिषद कायदा तयार करण्यात आला_
_जागतिक अपंग दिन हा मार्च महिन्यातील तिसरा रविवारी वेगवेगळ्या तारखेला येऊ लागला. एकीकडे जगातले सर्व विशेष दिन हे एका विशिष्ट तारखेला असतना अपंग दिन वेगवेगळ्या तारखेला येऊ लागला. त्यामुळे अपंग दिन देखील एका विशिष्ट तारखेला असावा असा मुद्दा समोर येऊ लागला. सन १९९४ मध्ये जागतिक आरोग्य परिषद व सयुंक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. ३ डिसेंबर जागतिक अपंग दिन सन १९९४ पासून साजरा करण्यास सुरुवात झाली._
_या दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या उद्धारासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन अपंगांच्या प्रती दया न दाखवता दिव्यांग व्यक्ती देखील सामान्य व्यक्ती प्रमाणे आपले जीवन सन्मानाने जगू शकतो हा आत्मविश्वास देवून त्यांना संधी देणे आवश्यक आहे. शासन स्तरावर विविध उपक्रम योजना राबविण्यात येते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे २०१६ मध्ये पारित झालेला दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम RPWD ACT 2016 हा कायदा भारत सरकारने पारित केला आहे._
_*दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणापासून ते* त्यांच्या पुनर्वसन होण्यापर्यंत शासनामार्फत विविध सवलती दिल्या जातात. दिव्यांग व्यक्तींच्या उद्धारासाठी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा, व्याख्याने , विविध स्पर्धा घेवून त्यांना प्रेरित केले जाते. त्यामध्ये हेलन केलर, लुईस ब्रेल, स्टीफन हॉकिंग या महान व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, दिव्यांग असून देखील अपंगत्वावर मात करून यशस्वी होता येते.
_दिवसेंदिवस दिव्यान्गांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या वर्षी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे._
_दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग ३ डिसेंबर पासून कार्यन्वित होणार आहे. *महाराष्ट्र राज्य हे दिव्यान्गांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.* दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभ पणे पोहचवण्यासाठी या विभागाची मदत होणार आहे._

0 Comments