प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांच्या वेतनाबाबत-दि १६/१/२०२५

दिनांक : १६/०१/२०२५.

प्रति,
गट शिक्षणाधिकारी,
पंचायत समिती सर्व
जिल्हा छत्रपती संभाजीनगर

विषय :- प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांचे वेतनाबाबत.

संदर्भ :- मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील दिनांक ०७-०१-२०२५ रोजी अहवाल वाचनामधील दिलेल्या सुचना

उपरोक्त विषयी संदर्भान्वये दिलेल्या सुचनाच्या अनुषंगाने आपल्या तालुक्याअंतर्गत शाळेच्या आस्थापनेशिवाय इतर कार्यालयात (उदा. जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिल कार्यालय / पंचायत समिती कार्यालय) प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ संबधिताच्या मुळ शाळेवर उपस्थित होण्याबाबत संबधितास सुचित करावे व संबधित कर्मचारी हे त्यांच्या मुळ शाळेवर उपस्थित न झाल्यास माहे जानेवारी २०२५ रोजीच्या वेतन देयकात संबधिताचे नाव समाविष्ठ न करता त्यांचे वेतन अदा करण्यात येवू नये. जर त्याचे वेतन अदा केल्यास आहरण व सवितरण अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
उपरोक्त प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी.

स्वा
(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छ. संभाजीनगर

प्रतिलिपी माहितीस्तव सविनय सादर
१) मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

(जयश्री चव्हाण)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छ. संभाजीनगर

Post a Comment

0 Comments