जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत,

दिनांक :- 28 फेब्रुवारी, 2025.
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनबाबत,

संदर्भ: आपले पत्र क्र. ठाजिप/प्राथ/शिक्षण/नियो ७-वशी/२०/६२१, दि.१३.१.२०२५.

महोदय,
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधिन पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणांस खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे :-

१) मुद्दा क्र. १ व २:- अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास, त्यापूर्वी एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये केलेली सेवा ही अवघड क्षेत्रातील सेवा समजण्यात यावी व सदर अवघड क्षेत्रातील कालावधी खंडीत सेवा धरुन या शिक्षकांच्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीबाबत कार्यवाही करावी.

२) मुद्दा क्र. ३ व ४: विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :- १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व). २) मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे.

Post a Comment

0 Comments