मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधीसाठी रुजू होणे बाबत..दि.२९/०४/२०२५

दि.२९/०४/२०२५
प्रति,
सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, (सर्व)

विषय :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधीसाठी रुजू होणे बाबत..
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, दि.०९.०७.२०२४.
२. शासन निर्णय क्र. कौविउ २०२४/प्र. क्र.११८/प्रशा-२, दि.१०.०३.२०२५
३. जिल्हा अहमदनगर यांचे पत्र क्र.३८६/२०२५, दि.१८.०३.२०२५
४. वि.आ.अमरावती यांचे पत्र क्र. कौवरोवउविआअम/योजना/८०२-१२, दि.११.०४.२०२५
५. वि.आ.छ. संभाजी नगर यांचे पत्र क्र. कौवरोवउविआछसं/कक्ष-५/CMYKPY/१४३३-४१, दि.१५.०४.२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्र.१ अन्वये "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरु करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता उक्त संदर्भक्र. २ च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी ११ महिने करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने शैक्षणिक संस्थामधील प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून वारंवार विचारणा होत आहे. सदर विषयी सादर करण्यात येते की, माहे फेब्रुवारी-२०२५ मध्ये राज्यात ५२१३ शैक्षणिक संस्थांमध्ये २३.१२३ प्रशिक्षणार्थी कार्यरत होते, सद्यस्थितीत ४०७३ प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत पाच महिन्याची मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेच्या कारणामुळे तर मे आणि जून महिन्यात शैक्षणिक संस्थांना अनुज्ञेय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोणतेही प्रशिक्षण मिळणार नाही, असे क्षेत्रिय कार्यालयाचे मत दिसून येत आहे.

यास्तव, शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना नव्याने पाच महिन्याच्या मुदत वाढीचे आदेश १ जुलै, २०२५ पासून अथवा सुट्टी नंतर शाळा / महाविद्यालय सुरू होण्याच्या तारखे पासून देण्यात यावे. त्याचप्रमाणे, संदर्भिय क्र.२ च्या शासन निर्णयामध्ये नमुद मुद्दा क्र.१ मध्ये आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित ५ 
महिन्याच्या Prakaran no. ०४-२५ CMYKPY कालावधी ११ महिने व इतर बाबी
कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच, अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरुन निर्णय घ्यावा, असे नमुद आहे. यास्तव, संबंधित सहायक आयुक्त यांनी खात्री करून ज्या आस्थापनेस हंगामी सुट्टया अनुज्ञेय असतात अशा आस्थापनांची वाढीव ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मुदत वाढीचे आदेश देण्यात यावेत. उदा. साखर कारखाना, इ. जेणेकरून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना योग्य प्रकारे कार्य प्रशिक्षण मिळु शकेल,

तसेच, ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे व पुढील ५ महिन्याचे प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी ११ महिने करण्यात आला त्या दिवसापासून म्हणजेच दि.१० मार्च, २०२५ पासून पुढील ६ महिन्याच्या कालावधीमध्ये रूजू होणे अनिवार्य आहे.

तरी, उपरोक्त प्रकारे योजनेची उचित कार्यवाही करून जास्तीत जास्त उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ मिळेल अशी कार्यवाही करावी.
Walt 29/4/25

(नितीन पाटील) भा.प्र.से.
आयुक्त,
कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता महाराष्ट्र राज्य

प्रत माहितीस्तवः-
मा.अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ३२

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तवः-
उप आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मुंबई/पुणे/नाशिक/छ. संभाजी नगर/अमरावती/नागपूर.

Post a Comment

0 Comments