:- 07/05/2025
महत्वाचे/अतितात्काळ/समायोजन प्राधान्य
प्रति,
१. अध्यक्ष/सचिव (सर्व) १
खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन छत्रपती संभाजीनगर जिल्हा
२. मुख्याध्यापक (सर्व)
खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
विषय :- सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत.
:-१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवच्या शर्ती) नियमावली १९८१
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टीएनटी-२ दिर्नाक १५.३.२०२४
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र.एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२ दिनांक १५.३.२०२४
४. मुख्याध्यापक यांच्या संच मान्यता पोर्टलवर डिजीटील साईनद्वारे उपलब्ध करुन दिलेली
सन २०२४-२५ संच मान्यता
५. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. शिसमा/२०२४-२५/समायोजन/टी-८/०२२०३/दिनांक २८ एप्रिल, २०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भिय पत्रानुसार कळविण्यात येते की, सन २०२४-२५ ची संच मान्यता शाळांच्या लॉगीनबर उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व मुख्याध्यापकांनी सन २०२४-२५ ची संच मान्यता आपलया लॉगीनवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावी.
वरील प्रमाणे प्राप्त झालेल्या सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या सहशिक्षकांचे संदर्भीय शासन निर्णय दिनांक १५.३.२०२४ नुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विहित केलेली आहे.
मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भ क्रमांक ५ अन्वये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हास्तरावर अनुदान प्रकार (अनुदानित/अंशतः अनुदानित) व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे दिनांक १३.०५.२०२५ पर्यंत पूर्ण करावी. तसेच दिनांक १३.०५.२०२५ रोजी समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मुळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही. सदरचे देयक मुळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. याची नोंद घेणेबाबत आदेशित केलेले आहे.
करिता आपणास कळविण्यात येत की, सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार पदे कमी झालेली असल्यास सेवाज्येष्ठता, विषय, आरक्षण, सुट इत्यादी बाबी विचारात घेवून त्यानुसार अतिरिक्त ठरविण्यात यावे. व सदरील अतिरिक्त शिक्षकांना ते अतिरिक्त झाल्याबाबतचे लेखी पत्र देवून त्यांची पॉच घेण्यात यावी. अनुदानित व अशंतः अनुदानित शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे प्रथमतः संस्था अंतर्गत रिक्त पदावर तात्काळ समायोजन करण्यात यावे. तदनंतर उर्वरित अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्याची माहिती सोबतच्या विहित प्रपत्र-अ मध्ये माहे मे, २०२५ च्या वेतन देयकासोबत दिनांक १३.०५.२०२५ पुर्वी अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, छत्रपती संभाजीनगर यांचेकडे सादर करण्यात यावीत. शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती माहे मे, २०२५ च्या वेतन देयकासोबत सादर न केल्यास संबंधित अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व व्यवस्थानाची राहील याची नोंद घ्यावी.
ज्या शाळांमध्ये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरलेले आहेत. परंतू संबंधीत संस्था/शाळां यांनी अशा अतिरिक्त शिक्षकांची माहिती माहे मे, २०२५ च्या वेतन देयकासोबत जाणीव पुर्वक सादर करणार नाहीत. व त्यामुळेअशा अतिरिक्त शिक्षकांची नांवे सदरील अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत. अशा शिक्षकांच्या समायोजनाची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही. माहिती अभावी यादीत समाविष्ठ न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची व वेतनाची व सेवाविषयक बाबींची जबाबदारी संबंधीत संस्था व मुख्याध्यापक यांची राहील. याची नोंद घ्यावी.
सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार मंजूर झालेल्या रिक्त पदांची माहिती आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती (पवित्र प्रणालीवर नोंदविलेली रिक्त पदे वगळून) सोबतच्या विहित प्रपत्र-व मध्ये माहे मे, २०२५ च्या मासिक वेतन देयकासोबत दिनांक १३.०५.२०२५ पुर्वी अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, छत्रपती संभाजीनगर यांचेकडे आवश्यक त्या अभिलेख्यासह सादर करावीत.
(अश्विनी लाठकर) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) #जिल्हा_परिषद_छत्रपती_संभाजीनगर
प्रतिलिपी :-
१. मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांना माहितीस्तव सविनय सादर.
३. अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, छत्रपती संभाजीनगर यांना देवून कळविण्यात येते की, सर्व अनुदानित/अंशतः अनुदानित शाळेच्या माहे मे, २०२५ च्या वेतन देयकासोबत रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती विहित प्रपत्रात सादर केल्या शिवाय सबंधीत शाळांची वेतन देयके स्वीकारण्यात येवू नये.
Scanned with
0 Comments