जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा)
ईमेल - scy.ahmednagar@gmail.com.
(टोल फ्री क्र. 1077)
दुरध्वनी क्र. 0241-2322432
==============================
विषयः- अहिल्यानगर जिल्ह्यातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहणेबाबत.
संदर्भ:
- 1) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दि. 09/05/2025 रोजीच्या व्ही. सी. द्वारे दिलेले निर्देश
2) मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. DMU 2025/
आदेश
ज्याअर्थी, संदर्भ क्र. 1 अन्वये पहलगाम, जम्मू-काश्मिर येथील अतिरेकी हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने राज्यामध्ये संभाव्य आपत्कालीन परिस्थितीबाबत सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना पूर्वतयारी करणेबाबत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले आहेत.
ज्याअर्थी, जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यानुषंगाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. आपत्कालीन उपाययोजनांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी करणेसाठी तातडीने अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांची गरज भासू शकते. त्यास्तव, अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना करणेकामी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.
त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहिल्यानगर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 30 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविणेकामी तसेच आपत्कालीन यंत्रणांना आवश्यकतेनुसार मदतीस उपलब्ध राहणेकामी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा रद्द करीत आहे व त्यांना त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी उपस्थित राहणेबाबत आदेशीत करीत आहे.
जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांनी जिल्हाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये तसेच सदरचा आदेश त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आणून द्यावा. वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतूदीनुसार संबंधीतांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अहिल्यानगर
(डॉ. पंकज आशिया) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहिल्यानगर
जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर
क्र. आव्यमपु/कार्या 193/135/2025
दिनांक 09/05/2025
प्रति,
विभागप्रमुख (सर्व), जिल्हा अहिल्यानगर.
प्रतः- मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडेस माहितीस्तव सविनय सादर
प्रतः- मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई यांचकडेस माहितीस्तव सविनय सादर
0 Comments