दि.१० मे २०२५
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)
२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
४. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. (सर्व)
विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत...
संदर्भ : १. विद्या समिक्षा केंद्र यांचा प्राप्त इ मेल दि. ८ मे २०२५
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा.२ vsk पत्र /२०२४-२५/०२४९१, दि. २४ एप्रिल २०२५.
उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT -३) मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटमध्ये गुण भरण्यासाठी जिल्ह्यांना यापूर्वी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
तथापि, सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील एकूण ८५,२८४ शाळांपैकी ७३,९९९ शाळांनी माहिती भरली असून अद्याप ११२८५ शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद न केल्याचे दिसून येत आहे. १०० टक्के गुण चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना अंतिम मुदतवाढ दि.१४ मे २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. गुणनोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
१. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) गुणांची नोंद करणेसाठी लिंक https://bit.ly/PAΤ-ΜΗ
तसेच संदर्भ क्र. २ अन्वये १०० टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच याचे अनुपालन न केल्यास उपरोक्त सर्व संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) / प्रशासन अधिकारी /
शिक्षण निरीक्षक यांना जबाबदार धरण्यात येवून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
0 Comments