सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत.. दि.27/05/2025

शासकीय व अनुदानित शिक्षण संपविण्यासाठी प्रशासकीय तत्परता

विषय:- सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत.. दि.27/05/2025
संदर्भ :
- 1. शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2017/(प्र.क्र.22/17)/टिएनटी-2, दि. 15.03.2024
2. सन 2024-25 संच मान्यता
3. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ अतिरिक्त/2025/1249435, दि. 15.05.2025
4. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे.क.प्राथ अतिरिक्त 2025/1805, दि.22.05.2025

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे.

सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय दि.15.03.2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.30.09.2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025 च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सदर सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शासनास सादर करावयाची आहे. त्यानुषंगाने एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनिहाय शिक्षकांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती दि.28.05.2025 पर्यंत संचालनालयास सादर करावी.

(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव : प्रशासन अधिकारी (प्रशासन), शिक्षण आयुक्तालय, म.रा.पुणे

Post a Comment

0 Comments