समाज माध्यमांवरती (Social Media) शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिका-यांवर त्यांचे कोणत्याही प्रकारचे मत, टिका अथवा आक्षेप न नोंदविणेबाबत.दि.१५ में .२०२५

दिनांक: 1.5 MAY 2025
-: परिपत्रक :-
विषय:
समाज माध्यमांवरती (Social Media) शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिका-यांवर त्यांचे कोणत्याही प्रकारचे मत, टिका अथवा आक्षेप न नोंदविणेबाबत.
उपरोक्त विषयाबाबत आपणांस असे कळविण्यात येते की, शासनाच्या/संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, संचालनालयाच्या आस्थापनेवरील काही कर्मचारी / अधिकारी हे फेसबुक (Facebook), युट्युब (YouTube), व्टिटर (Twitter), इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉटस् अॅप (WhatsApp). लिक्डइन (Linkedin) यासारख्या समाज माध्यमांवरती (Social Media) शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, बरिष्ठ अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिका-यांवर त्यांचे मत/टिका/आक्षेप नोंदवित असतात. शासकीय कर्मचारी/अधिकारी हे शासनाचा भाग असताना त्यांनी शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिका-यांवर त्यांचे कोणत्याही प्रकारचे मत, टिका किंवा आक्षेप नोंदविणे, ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम, १९७९ शी विसंगत असून, त्यांनी शासकीय कामकाजामध्ये सचोटी, कर्तव्यपरायणता इत्यादी राखण्यासंबंधीच्या त्यांच्या कर्तव्यांमध्ये बाधा आणणारी आहे. सदरील बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.

सबब, संचालनालयाच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी व अधिकारी यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील नमुद व अन्य कोणत्याही समाज माध्यमांवरती शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिका-यांवर कोणत्याही प्रकारचे मत, टिका किंवा आक्षेप नोंदवू नयेत, अन्यचा त्यांचेविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम, १९७९ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.

(अशोककुमार भ. भिल्लारे) संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रति,
सर्व सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता / सर्व उपसंचालक, परिक्षेत्रीय कार्यालये......
आपणांस असे आदेशित करण्यात येते की, सदरील परिपत्रक हे आपल्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या निदर्शनास आणुन देण्यात यावे व अनुपालन अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.

प्प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
मा. महासंचालक (न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई.

Post a Comment

0 Comments