मोडकळीस आलेल्या / धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शाळांमधील वर्ग न भरविणेबाबत...संदर्भ : मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या दि.25.07.2025 रोजीच्या VC मधील सूचना

दि. 26.07.2025
अतितात्काळ / महत्त्वाचे / विद्यार्थी सुरक्षा प्राधान्य
प्रति,
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती, (सर्व), जिल्हा छत्रपती संभाजीनगर

विषय :- मोडकळीस आलेल्या / धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शाळांमधील वर्ग न भरविणेबाबत...
संदर्भ : मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या दि.25.07.2025 रोजीच्या VC मधील सूचना

उपरोक्त विषयांकित प्रकरणी राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील सरकारी शाळेचा भाग कोसळून सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या शाळांमधील शाळाखोल्या / इमारतीचा काही भाग मोडकळीस आलेला असेल / धोकादायक झालेला असेल, अशा शाळांमधील संबंधित भागामध्ये / वर्गखोल्यांमध्ये वर्ग न भरवता शालेय व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने अशा वर्गाची सोय अन्यत्र सुरक्षित ठिकाणी करण्याबाबत सर्व मुख्याध्यापकांना तात्काळ सूचित करावे.

मोडकळीस आलेल्या / धोकादायक वर्गखोल्या / इमारत पाडण्याबाबत (निर्लेखित करण्याबाबत) मान्यतेसाठी नियमानुसार या कार्यालयाच्या दि.08.07.2025 च्या मार्गदर्शक पत्राप्रमाणे प्रस्ताव या कार्यालयाकडे तात्काळ सादर करावा. तसेच आवश्यकतेनुसार शाळा दुरुस्ती / नवीन शाळाखोलीसंबंधी प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्याविषयी निर्देश तात्काळ संबंधितांना देण्यात यावेत. प्रस्तुत प्रकरणी सर्व मुख्याध्यापकांनी आवश्यक दक्षता घेण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरूनही सूचित करण्यात यावे. तसेच या कार्यालयाचे पत्र दि.25.04.2025 प्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

(जयश्री चव्हाण) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments