अंतराबाबतचे चुकीचे प्रमाणपत्र पारीत करून प्रशासनाची दिशाभुल करणे बाबत.3/7/2025 छत्रपती संभाजीनगर

दिनांक 3/07/2025
:: कारणे दाखवा नोटिस ::

प्रति,
श्री. संभाजी आसोले (उप अभियंता)
बांधकाम उपविभाग,
ता. पैठण.

विषय :- अंतराबाबतचे चुकीचे प्रमाणपत्र पारीत करून प्रशासनाची दिशाभुल करणे बाबत.

संदर्भ :-1. आपण पारीत केलेले प्रमाणपत्र.

2. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेली सुनावणी दिनांक 03/07/2025.

उपरोक्त विषयी मी दिनांक 03/07/2025 रोजी शिक्षक बदली पोर्टलवर शिक्षकांनी Appeal to CEO म्हणून आक्षेपाची नोंद केलेली आहे. सदर प्रकरणी आपण पारीत केलेले प्रमाणपत्रावरून पती-पत्नी सेवेत असताना दोघांचे कार्यरत असलेल्या आस्थापनेचे अंतर देत असताना प्रकरणी अंतर चुकीचे दर्शविल्याची प्रथमदर्शनी दिसून येते.

'गुगल मॅपवर तपासणी केली असता चुकीचे अंतर प्रमाणपत्र दिल्याने प्रशासनाचा वेळ, दिशाभुल केलेचे प्रथमदर्शनी सिध्द होते यावरुन आपण महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967चा भंग केल्याचे आढळून येते. उक्त प्रकरणी आपण आपला खुलासा दोन दिवसाच्या अता-विहीत मार्गाने या कार्यालयास सादर करावा.

खुलासा अप्राप्त अथवा असमाधानकारक आढळून आल्यास आपणाविरुध्द महाराष्ट्र जि.प. जिल्हासेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी.

सोवत : आपले पारीत प्रमाणपत्र.
Mean अंकित भी 7125
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments