बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा
आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो कि, मुलगी असेल तर १८ वर्षाच्या आत व मुलगा असेल तर २१ वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही.
बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही.
बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे.
बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ (१०९८) या क्रमांकावर संपर्क साधू.
या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे.
आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात, आजूबाजूला, शहरात कोठेही बालविवाह नाही
याची दक्षता घेऊ.
"सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करू.छत्रपती संभाजीनगर जिल्हा सारा"
जय हिंद. जय महाराष्ट्र.
0 Comments